योगविज्ञानाचा प्रसार ही भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब : नितीन गडकरी

    21-Jun-2019
Total Views |
 
 

नवी दिल्ली : “पूर्ण विश्‍वात आंतरराष्‍ट्रीय योग दिवस उत्‍साहाने साजरा होतो आहे. भारतीय संस्‍कृती, इतिहास व वारसा यांचे प्रतीक योगशास्‍त्र आहे व जगामध्‍ये याला मान्‍यता मिळाली आहे, ही भारतीयांसाठी अभिमानास्‍पद बाब आहे “,असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केले.

 

स्‍थानिक यशवंत स्‍टेडियम येथे नागपूर महानगर पालिका व केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांच्या नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्‍व योग दिवसाच्‍या निमित्‍ताने आयोजित कार्यक्रमाच्‍या प्रमुख अतिथींच्या स्‍थानी ते बोलत होते.

 

जनार्दन स्‍वामी योगाभ्‍यासी मंडळ, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्‍था, श्रीरामचंद्र मिशन, नागपूर जिल्‍हा योग असोसिएशन व जिल्ह्यातील इतर योग प्रेमी संस्‍थांच्‍या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. याप्रसंगी नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार जिल्‍हाधिकारी अश्विन मुद्गल, मनपा आयुक्‍त अभिजित बांगर, , जनार्दनस्‍वामी योगभ्‍यासी मंडळाचे कार्यवाह रामभाऊ खांडवे, प्रामुख्‍याने उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat