जय श्रीराम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

17व्या लोकसभेतील खासदारांचा शपथविधी घोषणा आणि नार्यांमुळे गाजला. निवडणुकीत प्रचंड परिश्रम करून लोकसभेचे सदस्य बनलेल्या या मंडळींपैकी काही जण खासदारीची शपथ घेताना उत्तेजित होत असतील तर त्यात खूप काही वावगे आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु, यावेळच्या शपथविधी कार्यक्रमात ‘जय श्रीराम’चे नारे लागल्याने बर्याच जणांची जुनी पोटदुखी आणि मूळव्याध उफाळून आली आहे. या सर्व गदारोळात एका व्यक्तीच्या हरकतीकडे मात्र सोयिस्करपणे दुर्लक्ष झाले आहे. ती व्यक्ती आहे समाजवादी पार्टीचे संभल लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले शफीकुर्रहमान बर्क. वयस्कर व मुस्लिम पद्धतीची दाढी ठेवलेल्या या महोदयांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर काहीही कारण नसताना बडबड केली की, वंदे मातरम्च्या संबंधात बोलायचे झाल्यास, ते इस्लामच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही ते म्हणणे शक्य नाही. शफीकुर्रहमान यांच्या या आगावूपणामुळे सभागृहात गदारोळ होणे स्वाभाविक होते. दुसरे म्हणजे, बंगालमध्ये ‘जय श्रीराम’च्या नार्याने ममता बॅनर्जींना घाम फोडला आहे.
 
 
अत्याचार, मारहाण, हत्या, मतदानात घोटाळे इत्यादी सर्व ‘वाम’ मार्ग अवलंबणार्या ममता बॅनर्जींच्या नाकावर टिच्चून बंगालमधून भाजपाचे 18 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे ज्या ज्या वेळी बंगालचे सदस्य शपथ घ्यायला येत होते त्या त्या वेळी इतर सदस्य ‘जय श्रीराम’चे नारे देत होते. भाजपाच्या सर्व बंगाली खासदारांनी तर शपथेनंतर जय श्रीरामचे नारे दिलेत आणि हे स्वाभाविकच होते. इतक्या जीवघेण्या परिस्थितीतून ही मंडळी सही सलामत राहिली आणि खासदार म्हणून निवडूनही आली आहे. त्यामुळे शपथ घेताना त्यांच्या भावना दाटून येणे सहज आहे. तसेही सभागृहात एकमेकांना टोमणे मारणे वगैरे प्रकार सुरूच असतात. ती एक गंमत असते आणि एरवी रटाळ असणार्या कामकाजात ते एक प्रकारचे मनोरंजनही असते. या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करता आला असता; परंतु नारे ‘जय श्रीराम’चे असल्याने भोंगळ विचारवंत आणि मीडियाने यावर लगेच गरमागरम चर्चा सुरू केली. एखाद्याची टर उडविण्यासाठी ‘जय श्रीराम’चे नारे लावणे योग्य आहे का, असले प्रश्न आवेशाने विचारण्यात येऊ लागले आहेत. ज्या ज्या वेळी भारतीय मुसलमान, त्यांची वागणूक, त्यांची मानसिकता आणि त्यांची सार्वजनिक वक्तव्ये यांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा पृष्ठभूमीवर भारताच्या फाळणीची वेदनादायी स्मृती नकळत उमटत असते.
भारताची फाळणी होऊन आता 70 हून अधिक वर्षांचा काळ लोटला असला, तरी मनातून हे काही जात नाही. फाळणीच्या आधी झालेली हजारो हिंदूंची निर्घृण कत्तल, फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदूंची करण्यात आलेली ससेहोलपट, जाळपोळ, बलात्कार या गोष्टी कुणीही देशभक्त कसे विसरू शकणार आहे? या मुसलमानांनाच मुसलमानांचा वेगळा देश हवा म्हणून भारताचे दोन तुकडे करण्यात आले. तसे करूनही, या मुसलमानांचा हिंसाचार थांबलेला नाही. पाकिस्तानच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे स्वातंत्र्यानंतरही लाखो भारतीयांना आपला जीव गमवावा लागत आहे. याच युद्धपिपासू पाकिस्तानमुळे भारताला लाखो कोटी रुपये सीमेच्या संरक्षणासाठी खर्च करावे लागत आहे. फाळणीनंतर पाकिस्तान व आताच्या बांगलादेशमधील हिंदूंची (सुमारे 15 ते 20 टक्के) संख्या झपाट्याने कमी होत ती आता नाममात्र राहिली आहे. कुठे गेले हे हिंदू? त्यांची वाफ झाली का? की, जमिनीने त्यांना गिळले? नाही. ज्यांनी इस्लाम कबूल केला ते सुटले, बाकीच्यांना कापून काढण्यात आले. आजही तिथे जे काही हिंदू शिल्लक आहेत, ते दहशतीखाली जगत आहेत. त्यांच्या तरुण, सुस्वरूप मुलींना भरदिवसा पळवून नेऊन त्यांना जबरदस्तीने मुसलमान करून त्यांच्याशी लग्न करण्यात येत आहे. हिंदूंची मंदिरे व श्रद्धास्थाने तोडली जात आहेत. या घटनांच्या, इतिहासाच्या व वेदनांच्या पृष्ठभूमीवर, भारतातील सर्वसामान्य हिंदू, मुसलमानांकडे बघत असतो.
 
कुठलाही मुसलमान दिसला की त्याला या सर्व घटना आठवतात आणि त्याचे मन रक्तबंबाळ होते. आपल्या असहाय दुर्बलतेने तो मनातल्या मनात पेटून उठतो. हे योग्य की अयोग्य याचा विचार करण्यापेक्षा, हे सत्य आहे, हे वास्तव आहे, हे आम्ही मान्य केले पाहिजे. आणि म्हणूनच, जेव्हा केव्हा कुणी एखादा भारतीय, पाकिस्तानची भलावण करतो किंवा भारतविरोधी बोलतो, तेव्हा त्याला पाकिस्तानात जाण्याची किंवा पाठविण्याची भाषा तोंडात येते. त्यालाही हीच पृष्ठभूमी कारणीभूत आहे. सर्वसामान्य हिंदूंच्या मनातील मुसलमानांबद्दलची ही कटू भावना नष्ट व्हावी म्हणून, गेली 70 वर्षे या भावनेवर बोळा फिरविण्याचे सेक्युलर काम सातत्याने झाले आहे. आजही सुरूच आहे. परंतु, त्याने ही भावना बोथट होण्याऐवजी अधिकाधिक धारदार झाल्याचे आढळून येते. काही मुसलमानांच्या हट्टाखातर आपल्या मातृभूमीचे तुकडे होणे, ही प्रत्येक हिंदूंच्या मनातील सतत भळभळणारी जखम आहे. ती असल्या बोळे फिरवण्याने बरी होणारी नाही. याला एकच उपाय होता आणि आहे व तो म्हणजे, पाकिस्तानच्या निर्मितीला जबाबदार असूनही जे मुसलमान फाळणीनंतर तिकडे न जाता भारतातच राहिले, त्या मुसलमानांनी हिंदूंच्या या जखमेवर आपल्या आचार-विचारांनी मलम लावणे. हा उपचार झाला असता तर ही जखम कालांतराने बरी झाली असती. व्रण राहिला असता; पण चिघळली तर नसती! दुर्दैवाने ते झाले नाही किंवा असेही म्हणता येईल की, भारतातल्या राज्यकर्त्यांनी, भोंगळ विचारवंतांनी आणि मीडियाने त्यांना तसे करू दिले नाही. या कर्माची फळे भोगावीच लागणार आहेत.
 
बंगालमध्येही हेच घडले. ममता बॅनर्जींना ‘जय श्रीराम’ नार्याचा एवढा संताप का म्हणून यावा? खरेतर, रस्त्यावरील काही लोकांच्या या नारेबाजीकडे त्यांना दुर्लक्ष करता आले असते आणि तेच सोयिस्कर होते. परंतु, मुसलमानांचे आपणच एकमेव तारणहार आहोत, हे सर्वांच्या मनात ठसविण्यासाठी, ममता बॅनर्जींनी नारेबाजी करणार्या लोकांच्या मागे, स्वत:चा- मुख्यमंत्र्यांचा गाडीताफा थांबवून धावणे सुरू केले. आता लोक मजा घेत आहेत आणि ही बाई वेडीपिसी होऊन त्यांच्या मागे धावत आहे. मुसलमानांच्या लांगूलचालनापायी होणार्या अन्याय, अत्याचार व हिंसाचारापासून सुटका होण्यासाठी ‘जय श्रीराम’ हा हिंदूंचा एक मुक्तिमंत्र बनला आहे. या मंत्रात इतकी ताकद आहे की, जगातील कुठलीही पाशवी शक्ती, दडपशाही या मंत्राला थांबवू शकत नाही. जर लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य अशी व्याख्या असेल, तर कोट्यवधी लोकांना जय श्रीराम किंवा भारत माता की जय सारखे नारे लावावेसे वाटत असेल तर त्यांना रोखणे मूर्खपणाचे आहे. तो मूर्खपणा आजही काही राजकारणी, विचारवंत व मीडिया करत आहे. लोकांना आता ते मान्य नाही. हेच लोकसभेतील उपरोक्त घटनेवरून दिसून येते.
 
भारतात राहणार्या मुसलमानांनी खरेतर, या देशाचे तुकडे केल्याबद्दल समस्त हिंदूंची माफी मागायला हवी. आजही ते ती मागू शकतात. माफी तर सोडाच, हिंदूंना त्यांचे आराध्यदैवत श्रीरामाचे अयोध्येत मंदिरदेखील बांधण्यास अडथळे आणले जात आहेत. फाळणीसारख्या जघन्य अपराधाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी मुसलमानांनीच पुढाकार घेण्याची गरज असताना, त्यांचे वर्तन मात्र अतिशय मगरुरीचे दिसून येते. किमान अयोध्या, मथुरा आणि काशी ही तीन अत्यंत पवित्र तीर्थस्थाने हिंदूंच्या स्वाधीन करून, जर मुसलमानांनी गतकृत्याबद्दल माफी मागितली, तर आज जे ‘जय श्रीराम’सारखे नारे धारदार अस्त्र बनत चालले आहेत, त्याला आळा बसेल आणि त्याचा सार्वजनिक उद्घोष हळूहळू मंदावत जाईल. तसे झाले नाही, तर आज ‘जय श्रीराम’मुळे बंगालमध्ये भडकलेला वणवा सार्या हिंदुस्थानात केव्हा पसरला, हे कळणारही नाही. लोकसभेत जय श्रीरामचे नारे लागण्याच्या घटनेचे हे संकेत आहेत. ते समजून, उमजून घेतले नाही, तर बंगालनंतर आता कुणाची पाळी आहे, हे सांगता येणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@