
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे पुढील चार वर्षांच्या कालावधीत देशाच्या राजधानीला आर्थिक राजधानी मुंबईला आणि हावडा स्टेशनला आणखी जवळ आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या दोन्ही प्रवासातील अंतर जवळपास प्रत्येकी ५ तासाने कमी करण्याचे उद्दिष्ट रेल्वेने बनवले आहे. त्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करून या दोन्ही रेल्वेमार्गांना आधुनिक बनविण्याचे काम हाती घेतले आहे.
रेल्वेकडून या योजनेचा प्रस्ताव 'मिशन १०० दिवस' अंतर्गत आर्थिक बाबींच्या पूर्ततेसाठी कॅबिनेटसमोर मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाची औपचारिकता ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत पूर्ण करुन काम सुरु करण्याची योजना आहे. दिल्ली हावडा आणि दिल्ली मुंबई रेल्वे मार्ग प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी रेल्वेने या मार्गावरील चालणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनची गती वाढवून १६० किमी प्रतितास करण्याचे ठरवलं आहे.
यासाठी दोन्ही रेल्वेमार्गावरील रेल्वे ट्रॅकचे दुरुस्तीकरण आणि काही जागांवर आवश्यकता असेल तिथे बदल करण्याचे सुचवले आहे. प्रस्तावाच्या अनुसरुन दिल्ली हावडामध्ये १५२५ किलोमीटर लांब ट्रॅकसाठी ६ हजार ६८४ कोटी रुपये तर दिल्ली मुंबईमध्ये १४८३ किलोमीटरसाठी ६ हजार ८०६ कोटी रुपये खर्च होतील असा प्रस्ताव तयार केला आहे.
हे असेल विशेष
> देशातील ३० टक्के रेल्वे प्रवासी या दोन रेल्वेमार्गावर प्रवास करतात
> २० टक्के उत्पन्न या दोन रेल्वेमार्गावरील प्रवासामुळे मिळते.
> दिल्ली-हावडा प्रवास करण्यासाठी १७ तासांचा अवधी लागतो.
> दिल्ली-मुंबई या प्रवासासाठी १५.५ तासाचा अवधी लागतो.
> या दोन्ही रेल्वेमार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करुन प्रत्येकी १२ तास आणि १० तास करायचे आहे.
> यासाठी प्रतितास १६० किमी वेगाने रेल्वे धावल्या जातील
> सध्या या मार्गावर १३० किमी प्रतितास वेगाने ट्रेन धावत आहेत.
हे आहे मिशन १०० दिवस
> तिकीटावर मिळणार सब्सिडी सोडण्यासाठी गिव इट अप अभियान रेल्वेकडून राबविण्यात येणार
> महत्वाच्या पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या दोन ट्रेनची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणावर देणार
> रेल्वे दुर्घटना रोखण्यासाठी रेल्वे रुळ डिजिटल कॉरिडोरमध्ये बदलणार
> देशातील ४ हजार ८८२ रेल्वे स्थानकावर वाय-फाय बसवणार
> २०२३ पर्यंत देशातील २ हजार ५६८ रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यासाठी सरकारकडे ५० कोटींची मागणी
> ५० रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासोबत रेल्वे बोर्डाचं पुनर्गठन करणार
> रेल्वे सिग्नल सिस्टीम आणि अन्य तांत्रिक समस्यांना तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणणार
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat