कॅप्टन कोहलीचा 'असा'ही विक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीची विश्वचषकातील कामगिरी पाहता नवीन नवीन पराक्रम रचत आहे. पाकिस्तानविरुद्ध ७७ धावा करत बरेच विक्रम आपल्या नावावर केले. सर्वात कमी डावांमध्ये ११ हजार एकदिवसीय धावा करणारा खेळाडू ठरला. तर दुसरीकडे त्यांने कर्णधार म्हणून कमीत कमी डावांमध्ये ३ हजार धावा करण्याचा आणखी एक पराक्रम आपल्या नावावर केला.

 

पाकिस्तानविरुद्ध ७७ धावांची खेळी केल्यानंतर कोहलीने कर्णधार म्हणून ४९ डावांमध्ये ३ हजार धावा केल्या. त्याने महेंद्र सिंग धोनी (७०) आणि सौरव गांगुलीला (७४) मागे टाकले. तसेच, केन विल्यमसन (६७) आणि ए बी डिव्हिलिअर्सला (६०) मागे टाकले आहे. यामुळे कर्णधार कोहलीच्या किर्तीमानात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. याबरोबरच, कोहलीने २२२ डावांमध्ये ११ हजारांचा पल्ला गाठत मास्टर ब्लास्टर साची तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. सचिनने हा पल्ला २७६ डावांमध्ये गाठला होता. तसेच, रिकी पॉन्टिंगने २८६ आणि सौरव गांगुलीने २८८ डावांमध्ये हा टप्पा पार केला होता.

 

आयसीसी विश्वचषक २०१९मध्ये भारतीय संघ हा प्रमुख दावेदार मानला जात आहे. आतापर्यंत भारताने फक्त ४ सामने खेळले असून भारताने पूर्णपणे प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामना रद्द झाला असला तरीही दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवून भारतीय संघाने ४ सामन्यांमध्ये ७ गुणांची कमाई केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@