११ कोटी युवकांना मिळणार मुद्रा योजनेद्वारे कर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या योजनांचा आढावा त्यांनी घेतला. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत आत्तापर्यंत १९ कोटी युवकांना कर्जवाटप करण्यात आले असून आता सरकारने ३० कोटी युवकांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. येत्या पाच वर्षांत ११ कोटी युवकांपर्यंत मुद्र योजना पोहोचवण्यावर सरकारचा भर आहे. याशिवाय ५० लाखांपर्यंत विनातारण कर्ज देण्याचेही सरकारने लक्ष्य ठेवले आहे.

 

आत्तापर्यंत पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये कर्जवितरण केले जाते. शिशू, किशोर आणि तरुण या श्रेण्यांमध्ये वर्गीकरण केले आहे. या अंतर्गत ५० हजार ते १० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. शिशू अंतर्गत ५० हजार, किशोर योजनेत ५ लाख आणि तरुण योजनेअंतर्गत १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.

 

शिशू कर्जांचे प्रमाणे ५१ टक्क्यांवर

चालू आर्थिक वर्षांत सरकारतर्फे सहा लाख कर्जांचे अर्थ स्वीकारण्यात आले आहेत. त्यात ३२ हजार ४५७ कोटी रुपयांचे कर्जाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. तारण म्हणून माय़क्रो युनिट्स अंतर्गत क्रेडीट गॅरेंटी फंड स्थापित करण्यात आला आहे. मार्च २०१८ पर्यंत ४० हजार कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यातील शिशू कर्जाचा हिस्सा ५१ टक्के आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@