अखेर 'गब्बर' धवन विश्वचषकातून 'आऊट' ; पंतला संधी

    19-Jun-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवन विश्वचषकातून बाहेर पडला असल्याची माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली आणि चाहत्यांचा हिरमोड झाला. त्याच्याऐवजी रिषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पॅट कमिन्सचा बॉल लागून अंगठ्याला दुखापत झाली होती.

 
 
 

"शिखर धवनच्या डाव्या अंगठ्याला बॉल लागल्यामुळे फ्रॅक्चर झाले आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची मते जाणून घेतल्यानंतर असे स्पष्ट झाले आहे की धवनला दुखापतीतून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी जुलैच्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. परिणामी तो विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही." असे ट्विट करून बरेच दिवस चालेल्या या चर्चेला अखेर पूर्णविराम दिला. धवनच्या जागी सध्या संघात ऋषभ पंत इंग्लंडला पोहोचला आहे. त्याच्या संघप्रवेशाबद्दल अद्याप बीसीसीआयने निवेदन दिलेले नाही.

 
 
 

शिखर धवनने सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये १०३च्या स्ट्राईक रेटने १२५ धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यांमध्ये जरी धवनची फलंदाजी खराब झाली असली तरी मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याने शतक ठोकले होते. मात्र, त्याच सामन्यांमध्ये त्याला दुखापत झाल्यामुळे ऐन फॉर्मात आलेल्या गब्बरला विश्वचषकाचे पुढील सामने मुकावे लागणार आहेत. यामुळे आता संघ निवडीचा मोठा प्रश्न प्रशिक्षक आणि कर्णधार विराट कोहलीसमोर उभा ठाकणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat