मोदींच्या मालदीव दौऱ्यानंतर चीनला दणका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |

 


हिंदी महासागरात वेधशाळा बांधण्याचा करार तुटण्याची शक्यता




नवी दिल्ली : चीन आणि मालदीव या उभय देशांमध्ये हिंदी महासागरात वेधशाळा बांधण्याचा करार झाला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालदीव दौऱ्यानंतर तो करार तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या नेतृत्वात मालदीवची चीनशी जवळीक वाढली होती. याचदरम्यान चीनकडून वेधशाळा बांधण्याचा समझोता झाला होता. आता जनतेच्या कौलानुसार मालदीवमध्ये सत्ता पालट झाला. राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर मालदीवचे चीनसोबत असलेल्या द्विपक्षीय संबंधात कटुता आली आली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर मालदीवचे भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध मजबूत होताना दिसत आहेत. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचा दौरा केला. या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध मजबूत होण्यास मदत झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, २०१७ मध्ये मालदीवचे माजी राष्ट्रपती यामीन यांनी चीनसोबत 'प्रोटोकॉल ऑन इस्टेब्लिशमेंट ऑफ जॉइंट ओसन ऑब्जर्वेशन स्टेशन बिटवीन चायना अँड मालदीव्स' नावाचा करार केला होता.

 

हा करार चीनला मालदीवच्या उत्तरेकडील मकुनुधू येथे वेधशाळा बांधण्यासाठी परवानगी देण्यासाठी होता. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारताची चिंता वाढली होती. मात्र. या करारावर पुढील कार्यवाही थांबली आहे. जर हा करार झाला तर चीनला हिंदी महासागरातील महत्वाच्या मार्गावर अड्डा मिळाला असता. या माध्यमातून व्यापारी आणि दुसऱ्या जहाजांची वाहतूक वाढण्याची शक्यता होती. वेधशाळा बांधण्याचे ठिकाण भारताच्या समुद्र सीमेपासून जवळ असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या राजकीय कौशल्याद्वारे चीनला या जागेपासून दूर केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@