वाढदिवसाचा खर्च दुष्काळग्रस्तांना; काकासाहेब खाडे यांचा स्तुत्य उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |


 


मुंबई : राज्यात सद्यस्थितीमध्ये भीषण दुष्काळ असून मान्सूनची प्रतीक्षा लांबणीवर गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची अवस्था हवालदिल झाली आहे. याच परिस्थितीचे भान लक्षात घेऊन २९ वर्षाच्या एका उद्योजकाने सामाजिक बांधिलकिचा संदेश दिला आहे. काकासाहेब खाडे, असे या उद्योजकाचे नाव असून ते 'स्काय गरुडा डेव्हलपर' 'अभिनंदन' या चहाच्या ब्रँडचे सर्वेसर्वा आहेत. याशिवाय नवी मुंबई परिसरातील विविध समाजकार्यामध्येही त्यांचा सहभाग असतो.

 

१६ जून २०१९ रोजी काकासाहेब खाडे यांचा २९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचे भान लक्षात घेता काकासाहेबांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. यावेळी दीड लाख रुपयांचा निधी दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी मदतनिधी म्हणून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

 

रविवार दि. १६ जून रोजी होर्डिंग्ज, फ्लेक्स, हार, बुके, केक यावरील अनावश्यक खर्च टाळून सामाजिक काम करणाऱ्या 'नाथ प्रतिष्ठान'कडे हा दीड लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या निमित्ताने काकासाहेबांनी राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची यांच्या बी-४ या शासकीय निवासस्थानी भेट घेत मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. मुंडे यांनी काकासाहेबांच्या निर्णयाचे कौतुक करत काकासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, काकासाहेबांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@