सुपर ३० मधील 'जुगराफिया' हे गाणे प्रदर्शित

    15-Jun-2019
Total Views | 83



बिहार मधील एक गणितीतज्ञ म्हणून ओळखले जाणारे आनंद कुमार यांच्या आयुष्यातील संघर्षावर आधारित 'सुपर ३०' या चित्रपटामधील 'जुगराफिया' हे गाणे आज प्रदर्शित झाले. हे गाणे चित्रपटातील आनंद कुमार यांची भूमिका साकारणारा हृतिक रोशन आणि मृणाल ठाकूर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे चतुरस्त्र गायिका श्रेया घोषाल आणि कित्येक वर्ष श्रोत्यांच्या मनावर आपल्या सुमधुर आवाजाने मोहिनी घालणारे उदित नारायण यांनी गायले आहे.

'जुगराफिया' हे गाणे अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले असून या गाण्याचे शब्द अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. गाण्याचे रेकॉर्डिंग यशराज स्टुडिओ मध्ये झाले आहे. सुपर ३० हा चित्रपटामध्ये आनंद कुमार यांनी ३० अतिशय हुशार परंतु वंचित मुलांना आयआयटी स्पर्धा परीक्षेकरिता कसे तयार केले, त्यामागील त्यांचे कष्ट, संघर्ष याचे चित्रीकरण चित्रपटामध्ये पाहायला मिळेल.


सुपर ३० हा चित्रपट येत्या १२ जुलै ला देशभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला आय आय टी मधील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये यामुळे अडथळा निर्माण होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121