लडाख : आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक आठवडा बाकी असला तरी देशासह जगभरात योग दिनाबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच भारतीयांना अभिमान वाटेल असा एक व्हिडीओ समोर आला आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सचा म्हणजेच आयटीबीपीच्या जवानांचा हा व्हिडीओ आहे. योग दिनाचे औचित्य साधून या जवानांनी लडाखमधील १८ हजार फूट उंचीवर योगासनांचा सराव केला.
#Himveers of #ITBP gearing up for #5thInternationalDayofYoga at 18 K feet in Laddakh@narendramodi #yoga#InternationalYogaDay2019 #YogaDay2019 pic.twitter.com/8brk7jtb5Y
— ITBP (@ITBP_official) June 14, 2019
तुम्ही म्हणाल की, यात विशेष काय? तर आसपासच्या परिसरात रक्त गोठवणारी थंडी असते. अशा परिस्थितीमध्ये आयटीबीपीच्या या ‘हिमवीर’ जवानांनी योगाभ्यास केला. जवानांनी केलेल्या योगाभ्यासाचा व्हिडीओ आयटीबीपीने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे हिमवीर, चहूकडे बर्फ असतानाही योगासने करताना दिसत आहेत. जवानांच्या या योगाभ्यासाचे देशभरात मोठे कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat