
अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर जवळपास १०० कोटींची कमाई केल्यानंतर चित्रपटकर्त्यांच्या आशा आणखीनच पल्लवित झाल्या होत्या. 'भारत' चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या सलमान खान आणि कतरीना कैफ यांची जादू प्रेक्षकांवर झालेली असतानाच दुसऱ्या आठवड्यात मात्र या जादूचा प्रभाव थोडासा कमी झालेला पाहायला मिळाला. चित्रपटाची कमाई मात्र आश्चर्यजनक असून चित्रपट दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस २०० कोटींची कमाई करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. #Bharat Second Friday Business https://t.co/nrLZv6JAua
'भारत' हा चित्रपट ५ जून ला म्हणजेच ईदीच्या दिवशी प्रदर्शित झाला. त्यानंतर पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाने ९५ कोटींचा आकडा पार केला. आता दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाची कमाई जवळपास १७५ कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट २०० कोटींची कमाई करून एक नवा विक्रम रुचेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
आत्तापर्यंत चित्रपटाच्या वाटचालीमध्ये दुसऱ्या कोणत्या चित्रपटाचा अडथळा आला नव्हता हे या चित्रपटाच्या विक्रमी कमाई मागचे एक कारण असू शकेल मात्र आगामी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वर्ल्ड कपचा सामना हा सर्वांच्या जोव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे आता या सामन्याचा चित्रपटाच्या कमाईवर किती परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat