मुख्यमंत्रीपदावरून उदयनराजेंचे आघाडीवर शरसंधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2019
Total Views |




मुख्यमंत्री करायचं होते तर पंधावर्षापूर्वीच करायचे होते, राजेंनी सोडले मौन


सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीकडून खासदार उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील अशी चर्चा महाराष्ट्रभर चांगलीच रंगात आहे. यावर खुद्द राजेंनी मौन सोडले असून मुख्यमंत्रिपदाला आपण किंमत देत नसल्याचे म्हटले. एव्हढंच नाही तर मुख्यमंत्र्यांचे काम हे चार भिंतींत बसलेल्या कारकुनासारखे असते. आपल्याला जे जमत नाही ते आपण करत नसल्याची भूमिका राजेंनी मांडली. मुख्यंमत्री ऑफिस जर कास पठार येथे येणार असेल तर आपली तयारी असल्याचे सांगत राजे मुख्यमंत्री होणार या चर्चेतील हवाच काढून टाकली.

 

सातारा येथे गुरुवारी पत्रकार परिषद घेत राजेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिलखुलास उत्तरे दिली. मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीकडून तुमचे नाव पुढे येत आहे अशा प्रश्न विचारल्यानंतर राजेंनी आघाडीवरच शरसंधान केले. ते म्हणाले, "मुख्यमंत्री करायचं होतं तर पंधरा वर्षांपूर्वीच करायचं होतं. त्यावेळी केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे आघाडीची सत्ता होती. तेव्हा का नाही माझ्या नावाचा विचार केला. आघाडीत या पदासाठी कोणी लायक नाही म्हणून माझं नाव पुढे कारणं हे योग्य नाही. राजे एवढ्यावरच थांबले नाही तर, मला मुख्यमंत्री व्हायचं असत तर मी त्या हिशोबाने पावले टाकली असती, असा खुलासा त्यांनी केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@