एमआयएमच्या नगरसेवकांचा सभागृहात धुडगूस; सहा जणांचे निलंबन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |




औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज पुन्हा एकदा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. खासदार इम्तियाज जलिल यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून एमआयएमच्या नगरसेवकांनी सभागृहातच धुडगूस घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे महापौर नदंकुमार घोडे यांनी एका दिवसासाठी या सहाही नगरसेवकांचे निलंबन केले आहे.

 

सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व खासदारांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र एमआयएमच्या नगरसेवकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा प्रस्ताव मांडला. यावर इतर इतर सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर एमआयएमच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.

 

शिवसेना भाजप नगरसेवकांनी या घटनेचा निषेध केला. यानंतर उपमहापौर विजय औताडे यांनी गोंधळ घालणाऱ्या २० नगरसेवकांचे कायमस्वरूपी निलंबन करण्याचा मांडलेला प्रस्ताव मंजूर करत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला. दरम्यान, जलील सेटलमेंट करतात, गुंडगिरी करतात त्यामुळे त्यांचे अभिनंदन कसले करता असा सवाल काँग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी यावेळी उपस्थित केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@