भारताच्या हॅट्ट्रिक विजयावर 'पाणी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली :आयसीसी विश्वचषक २०१९मध्ये ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना खराब हवामान आणि पावसाच्या फटक्यामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडला प्रत्येकी १-१ गुण देण्यात आले . आता न्यूझीलंडच्या खात्यात ७ गुण जमा झाले असून पॉईंट्स टेबलवर अव्वल स्थानी आहे.

 

भारतीय संघाच्या खात्यात ५ गुण जमा झाले असल्यामुळे भारतने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. भारताने याआधी २ सामने जिंकले असून न्यूझीलंडविरुद्ध सामन्यामध्ये विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. सध्या न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये पहिल्या ४ क्रमांकासाठी काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

 

भारताचे तिनच सामने झाले असून उर्वरित सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विराट सेनेने सलग २ सामने जिंकून विश्वचषकावर आपली दावेदारी सिद्ध केली असली तरी त्याला इतर संघांचे तागडे आव्हान पाहायला मिळणार आहे. इंग्लंडमध्ये आयसीसी विश्वचषक २०१९ला सुरुवात झाल्यापासून १८ सामने झाले. त्यामध्ये ४ सामने हे एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आले. तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील सामना पहिल्या डावातील ७ षटकांनंतर थांबवण्यात आला.

 

श्रीलंका संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले त्यामध्ये २ सामने हे पावसामुळे रद्द करायला लागले. यामुळे आयसीसीच्या टीकेचा मारा सहन करावा लागत आहे. पावसामुळे सामना रद्द होत असल्यास राखीव दिवस का ठेवण्यात आला नाही, असा सवालही चाहते उपस्थित करत आहेत. यामुळे आयसीसीही कचाट्यात सापडली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@