अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीही म्हणतात 'मोदी है तो मुमकिन है'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्रीय मंत्री माईक पॉम्पियो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. भाजपने लोकसभा निवडणुकीत वापरलेली टॅग लाईन 'मोदी है तो मुमकीन है' पुन्हा चर्चेत आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी ही टॅग लाईन बोलून दाखवली. पॉम्पियो २४ ते ३० जून या कालावधीत भारत दौऱ्यावर येणार आहेत.

 

भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी 'इंडिया आयडियाज ऑफ अमेरिका-इंडिया बिझनेस कॉउंसिल'मध्ये केलेल्या भाषणात ते म्हणाले की, "भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी मोदी सरकार आणि ट्रम्प प्रशासनाकडे अद्वितीय, अशी संधी आहे. प्रचारात मोदींनी वापरलेल्या वाक्याचा आधार घेत मला जाणून घ्यायचे आहे, की भारत-अमेरिकेदरम्यान काय होऊ शकते. दोन्ही देशांकडे स्वत:च्या जनतेसाठी, हिंदी महासागर आणि जगाच्या भल्यासाठी एकसाथ पुढे जाण्याची चांगली संधी आहे. राष्ट्रपती ट्रम्पच्या नेतृत्वात अमेरिकन सुरक्षेसाठी कडक पाऊले उचलली आहेत. दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानच्या अस्वीकार्य सहयोगामुळे त्यांच्याविरोधात कडक धोरण अवलंबवले आहे." माईक पॉम्पियो यांच्या दौऱ्यात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील नातेसंबंध आणि घट्ट होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@