निरव मोदीचा जामीन नामंजूर : लंडन हाय कोर्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी निरव मोदीचा जामीन अर्ज लोणंद हाय कोर्टाने फेटाळला आहे. नीरव मोदी यांच्या याचिकेवर सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली. वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टातून तीन वेळा याचिका फेटाळल्यानंतर त्याने ३१ मे रोजी उच्च न्यायालयात अर्ज केला.

 

इंग्लंडचे उच्च न्यायालय 'रॉयल कोर्टस ऑफ जस्टिस'मध्ये मंगळवारी मोदीच्या याचिकेवरील पूर्ण सुनावणी झाली. मोदीच्या वकिलांच्या पथकाने वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात सलग तीनवेळा जामीन देण्याच्या निर्णयाविरोधात उच्च याचिका दाखल केली होती. मोदीचे वकील बॅ. क्लेयर मोंटगोमरी म्हणाले, भारत सरकारने दावा केलेल्या गुन्ह्यातील ते आरोपी नाहीत. खूप वर्षांपासून नीरव मोदी हे हिरे डिझाईनर आहेत. त्यांना प्रामाणिक आणि विश्वासू मानले जाते, असा त्यांनी दावाही केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@