प्रयोग ‘नारायणास्त्र’चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2019
Total Views |


 

अश्वत्थामा पांडवांच्या सैन्यावरती तुटून पडला. त्यानेनारायणास्त्राचा प्रयोग केला. एका क्षणात सगळे आकाश लाखो बाणांनी आणि धारदार चक्रांनी भरून गेले. त्यांचा पांडव सैन्यावर अखंड वर्षाव सुरू झाला. सर्व सैनिक सैरावैरा पळू लागले. कारण, या अस्त्राच्या मार्गात कोणी जिवंत राहणे शक्यच नव्हते! हे सारे युधिष्ठिराने पाहिले आणि सर्वांना सांगितले, “या अस्त्रास शरण जाणे हाच त्यातून सुटकेचा मार्ग आहे. तुम्ही जितका विरोध कराल, तितके हे अस्त्र शक्तिमान होईल. तुम्ही आपली शस्त्रे टाका आणि त्याला साष्टांग नमस्कार घालून शरण जा.” सर्वांनी तसे केले, पण भीम ऐकत नव्हता. तो म्हणाला, “मी त्याने फेकलेल्या अस्त्राला सामोरा जाण्याएवढा भेकड नाही.”

 

पण, त्यामुळे आकाशात दिसणारे सर्व बाण भीमाच्या दिशेने खाली आले आणि तो चहुबाजूंनी त्या बाणांनी घेरला गेला. त्या अस्त्राचे तेज शक्ती त्याच्यावर एकवटून त्याचा नाश होणार, असे वाटत होते. भीमाचे डोके अग्नीच्या ज्वालेप्रमाणे तापले. त्याच्याकडे पाहवत नव्हते. अर्जुनानेवरुणास्त्रसोडले आणि थोडी आग शमली, पण ते पुरेसे नव्हते. मग कृष्ण आणि अर्जुन त्याच्याकडे धावले आणि त्यांनी त्याच्या कायेत घुसलेली सर्व शस्त्रे बाहेर काढायला सुरुवात केली. त्याला भूमीवर झोपवले आणि तेनारायणास्त्रनिघून जाईपर्यंत त्याला उठू दिले नाही. म्हणून भीम वाचला. कृष्ण भीमाला रागावून म्हणाला, “भीमा, तू हे काय केलेस? एकीकडे तू म्हणतोस की, तू कौरवांचा द्वेष करतोस आणि दुसरीकडेनारायणास्त्रासमोर मरायला तयार होतोस? म्हणजे याचा अर्थ कौरवच जिंकणार!” कृष्णाने भीमाला वाचविले, हे दुर्योधनाने पाहिले आणि तो अश्वत्थाम्याला म्हणाला, “तू परत तेनारायणास्त्रसोड.”

 

पण अश्वत्थामा म्हणाला,“ ते अस्त्र एकदाच सोडता येते. दुसर्‍या वेळी ते सोडले तर आपल्या सर्वांचा नाश होईल. दुर्योधना, तू पाहिलेस की पांडव या अस्त्रासमोर नतमस्तक झाले, शरण आले. म्हणजे खरेतर क्षात्रधर्माप्रमाणे त्यांचा मृत्यू झाला आहे. ते मेल्यातच जमा आहेत.” पण, दुर्योधनाचे अशा लाक्षणिक मरणाने समाधान झाले नाही. त्याला सारे पांडव खरोखर मृत झालेले बघायचे होते. त्याने अश्वत्थाम्यास अधिक प्रभावी असे अस्त्र सोडण्याची विनंती केली.

 

अश्वत्थामा धृष्टद्युम्नवर तुटून पडला. जणू काही सिंहाने हत्तीवर झडप घालावी तसे ते दृश्य होते. मग अर्जुन पुढे आला आणि त्याने त्याला आवाहन केले, “मी तुझ्या पराक्रमाविषयी खूप काही ऐकले आहे. तू खरोखर किती समर्थ आहेस, तेच मला पाहायचे आहे. ये माझ्याशी लढून दाखव!” अश्वत्थाम्याने ते आव्हान स्वीकारले. अत्यंत प्रेक्षणीय असे ते द्वंद्वयुद्ध होते. अश्वत्थाम्याने अर्जुनावरअग्नेयास्त्रसोडले. त्यामुळे पांडवांचे सैन्य जळू लागले. त्याला उत्तर म्हणून अर्जुनाने चिडूनब्रह्मास्त्रसोडले. त्यामुळे अग्नीची आच कमी झाली आणि थंडगार झुळूक आली. अश्वत्थामा युद्धभूमीतून निघून गेला. त्याला व्यासमुनी भेटले. त्याने त्यांना विचारले, “मुनी, माझी अस्त्रे प्रभावशून्य कशी झाली? असे का?” त्यावरती ते एवढेच म्हणाले,“तू नर आणि नारायण यांच्यावर ती अस्त्रे सोडली. अर्जुन आणि कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष नर-नारायणाची जोडी आहे. तू त्यांचा पराभव करणे किंवा नाश करणे अशक्य आहे.

 

आता घरी जाऊन विचार कर. दु: करू नकोस. तुझ्या पित्यास स्वर्गाची प्राप्ती झाली आहे. चिंता करू नकोस. आता घरी जा आणि उद्याची तयारी कर.” कौरवांचे सैन्य दु:खात बुडून गेले होते आणि पांडव सैन्यात सुखाचे वारे वाहत होते. कारण, सेनापती द्रोण यांचा मृत्यू झाला होता. राधेय आणि दु:शासन यांनी निराश झालेल्या दुर्योधनाचेसांत्वन केले. त्याला धीर दिला. पण, व्यर्थ! तो काही केल्या शांत झाला नाही.    

 
       (क्रमश:)

- सुरेश कुळकर्णी 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@