नोकरी की गुलामी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2019   
Total Views |



मुस्लीम देशांमध्ये डोळे बंद करून कामधंदा करायला जाणाऱ्या गरजू-गरीब मुस्लीम बांधवांबद्दल चर्चा करायची आहे. हैदराबादमध्ये तर मुस्लीम कोवळ्या मुलींचा म्हाताऱ्या अरबांशी निकाह लावणे, त्यानंतर तो अरब जेव्हा भारतात येईल, तेव्हा ‘बिबी’ बनून राहणे, नंतर देहविक्रीच्या धंद्याला लागणे हे गरीब मुस्लीम मुलींचे प्राक्तन बनले आहे.


“अल्लाह, हिंदुस्थान मे शरिया कानून नही है, जहाँ हमारे लोग राज कर रहे हैं, जहाँ हमारा शरिया है, वहाँ जाना है, खैरत की सास लेनी है,” असा विश्वास असणारे कितीतरी मुसलमान आहेत. अर्थात, याबाबत त्यांची चूक नाही. ‘एक अल्लाह, एक कुराण, एक शरिया, एक मुसलमान’ असे ‘मुस्लीम ब्रदरहूड’चे चित्र त्यांच्यासमोर जाणीवपूर्वकरित्या तयार केले जाते. पण, ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या नावाने आपल्या देशाखेरीज इतर मुस्लीम देशांशी निष्ठा बाळगणाऱ्या काही मुस्लीम बांधवांचे डोळे आता उघडण्याची वेळ आली आहे. या परिक्षेपामध्ये भारतीय मुस्लीम बंधू आणि भगिनींना इतर मुस्लीम देशांमध्ये काय वागणूक दिली जाते, याचा विचार करायला हवा. मुस्लीम देशांमध्ये डोळे बंद करून कामधंदा करायला जाणाऱ्या गरजू-गरीब मुस्लीम बांधवांबद्दल चर्चा करायची आहे. हैदराबादमध्ये तर मुस्लीम कोवळ्या मुलींचा म्हाताऱ्या अरबांशी निकाह लावणे, त्यानंतर तो अरब जेव्हा भारतात येईल, तेव्हा ‘बिबी’ बनून राहणे, नंतर देहविक्रीच्या धंद्याला लागणे हे गरीब मुस्लीम मुलींचे प्राक्तन बनले आहे. मात्र, तिहेरी तलाक हवा म्हणून लाखोंच्या संख्येने आंदोलन करणाऱ्यांना या कोवळ्या निष्पाप मुलींचे हुंदके ऐकू येत नाहीत का? असो, ‘निकाह’च्या नावाने भारतीय मुस्लीम मुलींना फसवून लग्न करणे आणि त्यांना इतर मुस्लीम देशांमध्ये हातोहात विकणे किंवा गुलाम बनवणे हे सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज आपल्या देशातील जे मुस्लीम तरुण इतर देशांत विशेषतः सौदी अरेबियामध्ये नोकरीसाठी गेले आहेत, त्यांचे तिथे नक्की काय होते, हा चिंतनीय विषय आहे.

 

जोगेश्वरीला राहणारा मोहम्मद इमरान मोहम्मद युसूफ शेख हा २० वर्षांचा मुलगा. अरब लोक हे मुस्लीम, त्यामुळे ते आपल्याला मुस्लीम म्हणून भाऊच मानतील, अशी त्याची समजूत. या समजुतीमधून तो आणि मुंबईतील इतर २९ युवक सौदी अरेबियामध्ये जाऊन नशीब आजमवायचे स्वप्न पाहू लागले. सौदीमध्ये जायच्या तयारीला लागले. कुलाब्याच्या एका मुस्लीम एजंटमार्फत त्यांची दुबईला जायची व्यवस्था करण्यात आली. या दलालाने ‘मुस्लीम ब्रदरहूड’चा वास्ता दिलाच! या मुलांपैकी कुणी सुतारकाम करणारे, कुणी प्लंबर, कुणी इलेक्ट्रिशियन तर कुणी आणखी काही हुनर असलेले. दुबईला तुमच्या दर्जानुसार कामाला लावतो, असे सांगून दलालाने कुणाकडून ८० हजार, तर कुणाकडून एक लाखपर्यंत रक्कम वसूल केली. यामध्ये मोहम्मदकडून ८० हजार रुपये घेतले. त्याला सांगितले की, “तुला वातानुकूलित दुकानात बसून सेल्समनशिप करायची आहे. महिन्याला ३०-४० हजार रु. पगार, तीन महिन्यांचा प्रवासी व्हिसा संपला की अजून वाढवून मिळेल. आयुष्यभर तो वाढवता येईल.” पण, तिथे गेल्यावर या सगळ्यांना कचरा साफ करणे, विटा साफ करणे, अगडबंब ओझे वाहणे आणि अशाच प्रकारचे काम सक्तीने देण्यात आले. काम करण्याच्या तासाची निश्चिती नव्हती. उलट मुलांना उपाशी ठेवले गेले, कारण उपाशी राहिले तर झोप येणार नाही आणि त्या काळातही ते काम करू शकतील. राहण्याची व्यवस्था म्हणजे एका खुराड्यासारख्या खोलीत १८ जण. त्यामध्ये १२ ते १३ पाकिस्तानी मुसलमान आणि तीन ते चार जण भारतीय. सुरुवातीला ‘मुस्लीम ब्रदरहूड’ जपत मोहम्मदने या सगळ्यांशी ‘खैरियत-दुवा संबंध’ जपण्याचा प्रयत्न केला. ते सगळे पाकिस्तानी मुस्लीम मोहम्मद सारखेच फसवणूक झालेले. पण, संख्येने जास्त म्हणून या पाकिस्तान्यांनी भारतीय मुसलमान म्हणून मोहम्मद व त्याच्या मित्रांचे जमेल त्या पद्धतीने शोषण केले. मोहम्मद जिवावर उदार होऊन पुन्हा भारतामध्ये मुंबईत पळून आला.

 

मोहम्मद इमरान मोहम्मद युसूफ शेख सारखे हजारो युवक आणि युवती आज दुबई, रियाध आणि इतर ठिकाणी गुलामापेक्षा भयंकर जिणे जगत आहेत. आपल्याच धर्मबांधवांना फसवणारा तो मुस्लीम दलाल, आपल्या देशात आलेल्या गरजू भारतीयांना गुलाम बनवणारे शरिया समर्थक सौदी अरेबियातले ते अरब, खोलीत संख्येने जास्त आहोत म्हणून भारतीय मुस्लिमांचे शोषण करणारे ते पाकिस्तानी हे सारजण ‘मुस्लीम ब्रदरहूड’ मानणारेच होते. त्यामुळे मुस्लीम राष्ट्रामध्ये छोटी मोठी नोकरी करणाऱ्यांनी सावध असावे. ‘मुस्लीम ब्रदरहूड’ म्हणत ‘नोकरी’ऐवजी ‘गुलाम’ होण्याची पाळी येऊ शकते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@