बॉम्बस्फोटाने लाहोर हादरले : ९ ठार

    08-May-2019
Total Views | 63



लाहोर : पाकिस्तानातील लाहोर शहर बुधवारी शक्तिशाली स्फोटाने हादरले. येथील प्रसिद्ध सुफी दर्ग्याबाहेर स्फोट झाला. त्यात किमान नऊ जण ठार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले.

 

सुफी दर्ग्यातील दाता दरबारबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनात स्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दाता दरबारजवळील गेट क्रमांक दोन समोरील पोलिसांच्या दोन वाहनांमध्ये स्फोट झाला. पाच पोलिसांसह सुरक्षा रक्षक आणि एक नागरिक यात ठार झाला. या स्फोटात २४ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

अनेक नागरिकांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती लाहोरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी अश्फाक अहमद खान यांनी जिओ न्यूजला दिली. हा आत्मघाती हल्ला होता की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121