नौदलाच्या ताफ्यात कामोव्ह-३१ हेलिकॉप्टर सामील होणार

    04-May-2019
Total Views |



भारत रशियाकडून १० कामोव्ह-३१ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करणार


नवी दिल्ली : भारत रशियाकडून १० कामोव्ह-३१ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. रशियाकडून १० कामोव्ह-३१ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीस संरक्षण मंत्रालयाने मान्यता आज मान्यता दिली. दोन्ही देशांमध्ये तब्बल ३ हजार ६०० करोड रुपयांचा हा सौदा झाला आहे. नौदलाच्या जहाजांना हवाई हल्ल्यापासून वाचवण्यासाठी या लढाऊ हेलीकॉप्टरची आवश्यता असल्याने नौदलाच्या अधिकाऱ्यांनी संरक्षण मंत्रालयाकडे या हेलिकॉप्टरचा प्रस्ताव ठेवला होता. यावर संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे.

 

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारत व रशियामध्ये १० कोमोव्ह-३१ या लढाऊ हेलिकॉप्टरच्या खरेदीचा करार झाला आहे. ३ हजार ६०० करोड रुपयांचा हा करार झाला आहे. भारताकडे १२ कामोव्ह-३१ लढाऊ हेलिकॉप्टर असून यात आणखीन १० कामोव्ह-३१चा समावेश होणार आहे. सध्या या हेलिकॉप्टरचा वापर फक्त रशिया आणि चीन हे दोनच देश करत आहेत. कामोव्ह-३१ लढाऊ हेलिकॉप्टर इतर लढाऊ विमानांपेक्षा हलके आणि नियंत्रित करायला अधिक सोप्पे आहेत. यासोबतच हे हेलिकॉप्टर पाणबुडी विरोधात हल्ला करण्यास तत्पर आहेत. त्यामुळे आता भारतीय नौसेनेची ताकद आणखीनच वाढणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat