ठाण्यामध्ये पुन्हा वाळूमाफियांवर धडक कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2019
Total Views |



ठाणे : जिल्हा प्रशासनाने मुंब्रा, चुआ ब्रिज, कशेडी भागातील खाडीमधून वाळू उपसा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही वाळूमाफीया मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत होते. ही माहिती तहसीलदार कार्यालयाला मिळताच त्यांनी या वाळू माफियांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात वाळू माफियांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

 

शुक्रवारी मुंब्रा खाडीत अवैध वाळू उपस्याचे काम सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीनंतर संध्याकाळी छापेमारी करीत पथकाने वाळू उपसा करण्यासाठी खाडीत लावलेले ३ सेक्शन पंप आणि वाळू खाडीतून किनाऱ्यावर आणण्यासाठी वापरण्यात येणारे ३ बाज तसेच वाळू, असा सुमारे ४५ लाखांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@