जय श्रीराम म्हणताच पुन्हा दिसले ममतांचे रौद्ररुप

    31-May-2019
Total Views | 159



 

कोलकाता : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचा जय श्रीराम म्हणणाऱ्या नागरिकांना दटावणारा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तसाच प्रकार उघडकीस आला आहे. ममता बॅनर्जी यांचा ताफा बुधवारी परगणा जिल्ह्यातून जात असताना ममता 'जय श्रीराम' म्हणणाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्या. "हिंमत असेल तर समोर येऊन घोषणा द्या" असे आव्हान त्यांनी घोषणा देणाऱ्यांना केले.

 

लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध म्हणून ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये धरणे आंदोलन सुरू केले. अशाच एका धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या नैहाटी शहराकडे निघाल्या होत्या. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातून ममता यांचा ताफा जात असताना काही कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. त्यामुळे भडकलेल्या ममता गाडीतून उतरत घोषणा देणाऱ्यांवर धावून गेल्या.

 

संतापलेल्या ममता गाडीतून खाली उतरल्या "हिंमत असेल तर समोर या, माझा अपमान करण्याची तुमची हिंमतच कशी झाली, मला माहित आहे तुम्ही या राज्यातील नाहीत, मी हे खपवून घेणार नाही, तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा त्यांनी घोषणा देणाऱ्यांना यावेळी दिला.

 

सध्या बंगालमध्ये भाजप विरूद्ध ममता असा संघर्ष पेटला आहे. ममतांनी मोदींच्या शपथविधीकडेही पाठ फिरवली. भाजपविरोधात त्यांनी बंगालमध्ये धरणे आंदोलन सुरू केले. त्यासाठी त्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. ज्या मतदारसंघात हा प्रकार घडला तो मतदारसंघात भाजपच्या अर्जुन सिंह यांचा गड मानला जातो. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या दिनेश त्रिवेदी यांचा पराभव केला आहे.

 

ममतांनी सुरक्षा रक्षकांना ताफा अडवणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे लिहून घेण्यास सांगितले आहे. तुम्हाला चांगलाच धडा शिकवते, असे म्हणत त्या तेथून नैहाटीकडे रवाना झाल्या. ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यात भाजपला यश आल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, घोषणा देणाऱ्यांनी हीच त्यांची लोकशाही आहे का, असा सवाल विचारला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121