'चेहरे' मधील अमिताभ बच्चन यांची झलक प्रेक्षकांच्या समोर

    31-May-2019
Total Views |

 

 
 

 

आपल्या हजारो छटांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पडणाऱ्या सिने सृष्टीत ज्यांना एका सर्वोच्च स्थान आहे अशा अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट म्हणजे 'चेहरे'. रुमी जाफरी दिग्दर्शित चेहरे या चित्रपटातील बिग बींच्या भूमिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या समोर आली. या फर्स्ट लूकमध्ये अमिताभ बच्चन एका वकिलाच्या वेशात दिसून येत आहेत.

 

'चेहरे' हा एक रहस्यमय आणि रोमांचक चित्रपट आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखेत असून ते वकिलाची भूमिका साकारणार आहेत तर इमरान हाशमी एका उच्चब्रू व्यावसायिकाची भूमिका साकारणार आहे. क्रिती खरबंदा देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर अनु कपूर, अमृता पुरी, रिया चक्रबर्ती, सिद्धांत कपूर, ध्रीतिमान चॅटर्जी, रघुबीर यादव हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

 

हा चित्रपट पुढील वर्षी २१ फेब्रुवारीला देशभर प्रदर्शित होणार आहे. मात्र त्या आधी नुकत्याच आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या लूकची चर्चा आणि प्रशंसा होताना दिसत आहे. आता प्रेक्षक या चित्रपटातील आणखी खुलाश्यांच्या प्रतीक्षेत राहणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat