शपथविधी सोहळ्यावेळी अबुधाबीत टॉवर लखलखले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2019
Total Views |




अबुधाबी : प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा निवडून आलेल्या मोदी २.० सरकारच्या खासदारांनी गुरुवारी दुसऱ्यांदा शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांचा सामावेश मंत्रीमंडळात करण्यात आला आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातने यानिमित्ताने अबुधाबीतील एका तेल कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारतीला मोदींच्या फोटोसह प्रिन्स आणि युएईचे सुप्रिम कमांडरचे फोटोंची झळाळी देत या शपथविधी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.

 
 
 

संयुक्त अरब अमिरातच्या अबु धाबी येथे राष्ट्रीय तेल कंपन्यांची औद्योगिक कार्यालये आहेत. या इमारतीवर डिजिटल स्क्रीन बसवण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वीच युएईने मोदींना तेथील सर्वोच्च मानाचा झायेद पुरस्कार देऊन सन्मानित केले. युएईचे अध्यक्ष शेख खलिफा बीन झायेद अल नाह्यान यांनी हा पुरस्कार दिला.

 

भारतासोबतच्या ऐतिहासिक मैत्री आणि धोरणांसाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध उपयुक्त ठरणार आहेत. अबु धाबीचे प्रिन्स मोहम्मद बीन झायेद यांनी ट्विट करत ही माहीती दिली. मोदींचे फोटो इमारतीवर झळकवितानाचा व्हिडीओ तेथील भारतीय दूतावासाने ट्विट केल्याने भारतीयांनाही या गोष्टीचा अभिमान वाटत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@