कल्याणची सुष्मिता ठरली 'मिस टिन वर्ल्ड २०१९'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019
Total Views |




ठाणे : मूळची कल्याणची असलेल्या सुष्मिता सिंग हिने अमेरिकेत पार पडलेल्या आतंरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारत मानाचा 'मिस टिन् वर्ल्ड २०१९' हा किताब जिंकला. सुष्मिता सिंग हिने नोएडा दिल्ली येथे २४ राज्यातील मुलींनी सहभाग घेतलेल्या स्पर्धेत आपली चुणूक दाखवत मिस टिन इंडिया वर्ल्ड २०१९च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. सुष्मिताच्या या यशाबद्ल शिवसेनच्या वतीने तिचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला होता.

 

तू जिंकलीस तर तुझ्यातील सेवाभावाचे जगाला कसे दर्शन घडवशील ? या प्रश्नावर बोलताना ती म्हणाली की, “मला सांगण्यात आले होते की मी सुंदर नाही आहे. पण मी अथक परिश्रम केले आणि माझ्या स्वतःसाठी आत्मविश्वासाने उभी राहिले. म्हणूनच या जगातील मुलींसाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करणारी एक प्रेरणा म्हणून मला जगायला खूप आवडेल.हे सुश्मिताने दिलेले उत्तर ऐकून परीक्षक अक्षरशः स्तब्ध झाले.

 

मिस टिन वर्ल्ड स्पर्धा २०१९ ही भारताशिवाय अनेक देशात घेतली जाते. भारतात ही स्पर्धा जिंकल्यानंतर सुश्मिता हिची निवड लॅटीना, अमेरिका येथे होणार्‍या मिस टिन वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती. १८ ते २७ मे दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ३० देशातून आलेल्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. यापैकी अंतिम स्पर्धेसाठी सहा जणींची निवड करण्यात आली. त्यामध्ये सुष्मिता सिंग हिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली चुणुक, हुशारी, हजरजबाबीपणा, सौंदर्य या गुणांच्या जोरावर जागतिक मानाचा मिस टीन वर्ल्ड किताब पटकवला. सुष्मिताच्या या जागतिक स्पर्धेतील यशानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@