'गेम ओव्हर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

    30-May-2019
Total Views |

  

 

मनमर्जिया फेम तापसी पन्नूच्या 'गेम ओव्हर' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. याआधी प्रदर्शित झालेल्या टीजरमधून तापसीची भूमिका थोडीफार उघड झाली होती. टीजरमधील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक देखील झाले. नुकताच आलेला ट्रेलर अतिशयक रोमांचक असून यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्कंठा आणखीनच वाढणार आहे.

 

स्वप्ना नावाची एक गेम डिझायनर मुलगी आहे जीचा नुकताच अपघात झाला असून या अपघातात तिच्या पायांना दुखापत झाली आहे आणि त्यातून ती सावरायचा प्रयत्न करत आहे मात्र या अपघातामुळे आतल्या आत ती पूर्णतः कोलमडून गेली आहे. अशातच काही वाईट शक्तींच्या जाळ्यात ती सापडते पण या सगळ्या दिव्यातून ती स्वतःला कशी बाहेर काढते?. तिची हिम्मत, धैर्य आणि आणि भयाच्या उत्कट भावना याची ही कथा आहे. आणि अखेर स्वप्ना, ज्या मुलीने आपल्या आयुष्यात सगळे गमावले आहे मात्र जिची जगण्याची इच्छा आणि उमेद अजूनही टिकून आहे अशा या मुलीची ही कथा आहे.

 

अश्विन सर्वणन दिग्दर्शित गेम ओव्हर हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये येत्या १४ जूनला भारतभर प्रदर्शित होणार आहे. अश्विन सर्वणन आणि काव्या रामकुमार यांची ही कथा प्रेक्षकांना किती भावते याचा निकाल आता लवकरच लागणार आहे.

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat