आयुष्मान खुरानाचा ट्विटरवरील व्हिडीओ व्हायरल

    30-May-2019
Total Views |

 

समानतेचा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकाला आहे हे चित्रपटातून पटवून देण्याचा प्रयत्न अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'आर्टिकल १५' या चित्रपटातून करण्यात येणार आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या आयुष्मान खुराना याने आज ट्विटरवर टिझर प्रदर्शित झाल्याचे जाहीर केले मात्र त्यावर क्लिक केल्यास हा व्हिडिओ प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा ठरतो.

 

याचे कारण म्हणजे हा व्हिडीओमध्ये खरे तर चित्रपटाचा ट्रेलर नसून एक भाषण आहे. त्यात आयुष्मान खुराना आपल्या चित्रपटातील भूमिकेत म्हणजेच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या भूमिकेत असून आपल्या देशातील नागरिकांसाठी त्याने एक संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. आपकी औकात आपको यह ट्रेलर देखने कि अनुमती नहीं देती... इस भेद-भाव से बुरा लागा ना?  भारत के पिछले जाती के लोगो को ऐसा एहसास हर दिन होता है" ...असे भाषण त्याने प्रेक्षकांना उद्देशून केले आहे.

 

काही म्हणा हा व्हिडीओ प्रभावशाली आहे. थोडा वेळ का होईना पण हा व्हिडीओ पाहिल्यावर देशातील भेदभावाचा प्रेक्षक नक्की विचार करतील. हा व्हिडीओ पाहिल्यावर ट्रेलरबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढेल त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर आज ४ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट येत्या २८ जूनला भारतभर प्रदर्शित होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat