बळजबरीच्या लग्नगाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019   
Total Views |



ब्रिटनच्याफोर्स्ड मॅरेज युनिट’ (एफएमयु)च्या आकडेवारीनुसार, २०१८ साली ब्रिटनच्या नागरिकांचे पाकिस्तानींबरोबर असे तब्बल ७६९ मर्जीविरोधात विवाह पार पडले. त्याखालोखाल १५७ अशा बळजबरीच्या लग्नगाठी बांगलादेशींनी, तर ११० अशीच प्रकरणे भारतीयांच्या बाबतीत नोंदवली गेली. यातील दुसरी गंभीर बाब म्हणजे, बळजबरीच्या या बंधनात अडकलेल्या या ब्रिटिश महिला नसून ब्रिटिश पुरुषांची संख्या यात सर्वाधिक आहे. त्यातही ३० टक्के पुरुष हे एकट्या लंडनमधले आहेत. याचे कारण तसे अगदी स्पष्ट आहे.

 

‘विवाह’ ही गृहस्थाश्रमाची पहिली पायरी आणि संसारसुचितेचा उंबरठा. हा उंबरठा ओलांडल्यानंतर स्त्री आणि पुरुष केवळ कायदेशीर करारान्वयेच पती-पत्नी म्हणून बद्ध होत नाही, तर सर्वार्थाने हे दोन जीव एकजीव होतात. ‘तुझं-माझं’चं रूपांतर ‘आपलं’मध्ये होतं. ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ हा विवाहपश्चात दाम्पत्यासाठी तसा अगदी परवलीचा शब्द. प्रारंभीच्या काळात तर अगदी दैनंदिनीचा भागच. त्यामुळे दाम्पत्याला शारीरिक, मानसिक, भावनिक खाचखळग्यांमधून कशीबशी तारेवरची कसरत करत हा जीवनगाडा हाकावा लागतो. यालाच म्हणतात, ‘जीवन एैसे नाव!’

 

पण, जर हे आयुष्यभराचे नाते, जन्मोजन्मीच्या शपथा बळजबरीने कोणाच्या भाग्यात मारल्या जात असतील तर? मर्जीविरुद्ध, पैशाच्या आमिषापोटी आणि इतर कारणास्तव विवाहासारखे पवित्र बंधन जर कोणासाठी फाशीचा फंदा ठरत असेल तर? होय, असे प्रकार सर्रास ग्रामीण भारतात खासकरून पंजाब-हरियाणा, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये आढळून येतात. बंदुकीच्या जोरावर सुशिक्षित, चांगल्या कमावत्या मुलांचे अपहरण करून बळजबरीने त्यांचा विवाह अशिक्षित, गावंढळ आणि काही वेळेला दिव्यांग मुलींशी लावून दिला जातो. यामुळे दोघांनीही सुखी वैवाहिक जीवनाला मुकावे लागते आणि त्याची परिणती अखेरीस विवाह तुटण्यात, हत्येत किंवा आत्महत्येत होताना दिसते. परंतु, ही बळजबरीच्या विवाहाची कुप्रथा फक्त ग्रामीण भागात नाही, तर अगदी उच्चभ्रू घराण्यांमध्ये, जगातील इतरही अनेक देशांमध्ये घडताना दिसते आणि विकसित देशांपैकी एक असलेला ब्रिटनही याला अपवाद नाही. ब्रिटनमध्येही अशा बळजबरीच्या विवाहांची संख्या मोठी असून पाकिस्तानींचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक आहे.

 

ब्रिटन हा देश युरोपातील सर्वाधिक पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशात पाकिस्तानींची लोकसंख्या ही जवळपास ११ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे पाकिस्तानींचे ब्रिटनप्रेम विवाहाच्या बाबतीतही दिसून येते. ब्रिटनच्या ‘फोर्स्ड मॅरेज युनिट’ (एफएमयु)च्या आकडेवारीनुसार, २०१८ साली ब्रिटनच्या नागरिकांचे पाकिस्तानींबरोबर असे तब्बल ७६९ मर्जीविरोधात विवाह पार पडले. त्याखालोखाल १५७ अशा बळजबरीच्या लग्नगाठी बांगलादेशींनी, तर ११० अशीच प्रकरणे भारतीयांच्या बाबतीत नोंदवली गेली. यातील दुसरी गंभीर बाब म्हणजे, बळजबरीच्या या बंधनात अडकलेल्या या ब्रिटिश महिला नसून ब्रिटिश पुरुषांची संख्या यात सर्वाधिक आहे. त्यातही ३० टक्के पुरुष हे एकट्या लंडनमधले आहेत. याचे कारण तसे अगदी स्पष्ट आहे.

 

इतर देशांतील मुलींनी ब्रिटिश मुलाशी लग्न केल्यानंतर आपसुकच त्यांना ब्रिटिश नागरिकत्व पदरात पाडून घेता येते. शिवाय, स्वत:चा देश सोडून एक उच्चभ्रू जीवनशैली आणि तीही पतीच्या पैशावर मज्जा मारता येते. त्यामुळे पाकिस्तान तसेच भारतातील काही श्रीमंती मंडळी नेहमी अशा ब्रिटिश तरुणांच्या शोधात असतात, जे आर्थिकदृष्ट्या सधन तर आहेच, पण त्यांना कसेबसे ब्लॅकमेल करून, फसवून आपल्या मुली त्यांच्या गळ्यात कशा मारता येतील. मुलांबरोबरच ब्रिटिश मुलींनाही अशाच प्रकारे ‘गोरी सूनबाईच हवी’ म्हणून विवाहाच्या जाळ्यात अडकवण्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे ब्रिटन सरकारने अशा प्रकरणांसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि संपर्कासाठी ई-मेलचा पत्ता जारी केला असून अशाप्रकारे कुठल्याही बळजबरीला ब्रिटिश नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. शिवाय अशाप्रकारच्या गुन्ह्यांना २०१४ पासून कायदेशीर सात वर्षांच्या शिक्षेचीही कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. पण, तरीही हे प्रकार थांबलेले नाहीत. उलट, यापैकी सात टक्के बळजबरीचे विवाह तर ब्रिटनमध्येच पार पडले आहेत. पण, तशा प्रकरणांची रीतसर तक्रारच प्राप्त न झाल्याने ब्रिटन सरकारला अशा प्रकरणांमध्ये थेट हस्तक्षेप करता येत नाही.

 

२०१८ साली अशा जवळपास १७०० हून अधिक समोर आलेल्या प्रकरणांत सरकारने ब्रिटिश नागरिकांना साहाय्य केले आहे. पण, आता ब्रिटिश सरकारने याविषयी अधिकाधिक जागृती करून ब्रिटिश तरुण-तरुणींना अशा कुठल्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. कारण, प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या त्या व्यक्तीचा हेतू नेमका काय असेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे विदेशात लगीनगाठी जुळवताना संबंधित वर-वधूची संपूर्ण माहिती काढूनच त्यांच्यावर विश्वास ठेवा. कारण, विदेशी नागरिकांनीही भारतीय मुलींना आपल्या प्रेमाच्या ऑनलाईन जाळ्यात ओढून, त्यांच्याशी लग्न करून विदेशात मोेलकरीण म्हणून राबविल्याच्याही घटना घडल्या आहेत. तेव्हा, लग्नगाठी बांधताना सावधान!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@