
कबीर खान दिग्दर्शित '८३ द फिल्म' चित्रपटातील भारतीय संघ नुकताच चित्रपटाच्या पुढील चित्रीकरणासाठी लंडनमध्ये रवाना झाला आहे. एकीकडे भारतीय संघ वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांमध्ये आपला जलवा दाखवत आहे तर दुसरीकडे या चित्रपटातील कपिल देव अर्थात रणवीर सिंह आणि त्याची पलटण असे दोन्ही संघ प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहेत.
Squad of ‘83 has left the building ! 🔥. @83thefilm pic.twitter.com/iejQIgD6Uu
— Adinath Kothare (@adinathkothare) May 28, 2019
'८३ द फिल्म' या चित्रपटामधील टीम इंडिया चित्रीकरणासाठी लंडनला जाण्यापूर्वी रणवीर सिंगने पूर्ण स्टारकास्ट एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये पहिल्यांदाच चित्रपटातील सगळ्या भूमिकांचे दर्शन एकाच वेळी घडले आहे.
आदिनाथ कोठारे, जाटना सरना, साकिब सलीम, चिराग पाटील, पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, अम्मी विर्क, आणि जिवा या चित्रपटातील इतर काही महत्वाची नावे आहेत. याआधी आपण या कलाकारांना धर्मशाळा येथे आपल्या भूमिका समजून घेण्यासाठी प्रशिक्षण घेताना पहिले होते. सध्या जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट पुढील वर्षी १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat