पार पडणार पहिला नॉमिनेशन टास्क…
कोण असणार सुरक्षित कोण होणार नॉमिनेट ?
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज देखील बऱ्याच विषयांवर चर्चा आणि वाद रंगताना दिसणार आहे. तसेच काल पार पडलेल्या भागामध्ये सदस्यांनी सहमताने चार अपात्र सदस्यांची नावे बिग बॉसना सांगितली. ज्यामध्ये अभिजित बिचुकले, मैथिली जावकर, वैशाली म्हाडे आणि शिव ठाकरे यांचा समावेश होता. या प्रक्रीयेमध्ये बिग बॉस यांनी चारही सदस्यांना Activity Area मध्ये बोलावले. शिवने त्याच्यासमोर ठेवलेला लखोटा उघडला आणि त्यामध्ये नॉमिनेटेड असे लिहिले होते त्यामुळे शिव घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये थेट नॉमिनेट झाला, तर मैथिलीच्या लखोट्यामध्ये काहीही लिहिलेले नसल्याने ती बिग बॉसच्या घरामध्ये रहाण्यास पात्र ठरली. तर वैशाली आणि अभिजित यांना नशिबाने साथ दिली कि नाही हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.
आजच्या भागामध्ये घरातील काही सदस्य अभिजित बिचुकलेबद्दल बोलताना दिसणार आहे. तर पराग आणि विणा यांच्यामध्ये नेहा शितोळेबद्दल चर्चा रंगणार आहे. दुसरीकडे शिवानी नेहाला अभिजित बिचुकले आणि रुपाली भोसले यांच्यामध्ये झालेला किस्सा सविस्तर सांगणार आहे. माधव देवचक्के आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये मोठी चर्चा रंगणार आहे.
तर दुसरीकडे बिग बॉस नॉमिनेशन प्रक्रियायेसाठी एक टास्क घोषित करणार आहेत. ज्यामध्ये टीम अभिजित बिचुकले आणि वैशाली म्हाडेया टीम मध्ये सिझन २ चा पहिला नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. आता सदस्य कुणाला सुरक्षित करणार? घरामध्ये ग्रुप पडणार का? कोण कोणाच्या टीम मध्ये जाणार? हे बघणे रंजक असणार आहे. जाणून घेण्यासाठी नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ \रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat