प्रसिद्ध स्टंट मॅन वीरू देवगण यांचे निधन

    27-May-2019
Total Views | 64

 

 

बॉलिवूड चित्रपट सृष्टीत स्टंट मॅन म्हणून नावाजलेले दिग्दर्शक आणि ऍक्शन कोरिओग्राफर वीरू देवगण म्हणजेच सुपरस्टार अजय देवगण यांच्या वडिलांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील सांताक्रूझमधील सूर्य इस्पितळात काही दिवसांपूर्वी त्यांना ठेवण्यात आले होते अशातच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या खालावलेल्या तब्ब्येतीमुळे ते फारसे घराच्या बाहेर पडत नसत. मात्र अजय देवगण यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'टोटल धमाल' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला ते उपस्थित होते.

 

हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक प्रसिद्ध चित्रपटांमधील ऍक्शन सिन त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. ज्यामध्ये इन्कार, मिस्टर नटवरलाल, क्रांती, हिम्मतवाला, शहेनशहा, त्रिदेव, बाप नंबरी बेटा दस नंबरी, फूल और कांटे अशा काही गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. 'हिंदुस्थान की कसम' हा अजय देवगण, अमिताभ बच्चन, मनीषा कोयराला आणि सुश्मिता सेन यांना एकत्र घेऊन त्यांनी दिग्दर्शित केलेला एक चित्रपट जो प्रचंड गाजला.

 

त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अन्य कलाकारांनी अभिनेता अजय देवगण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति सहानुभूती व्यक्त केली आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121