अलाद्दिनची बॉक्स ऑफिसवर सरशी

    27-May-2019
Total Views |



हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथ जिनीची भूमिका साकारत असलेल्या अलाद्दिन चित्रपटाने बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीत वर्चस्व मिळवले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या इंडियाज मोस्ट वॉन्टेड आणि पीएम मोदी या चित्रपटांना मागे सारत
'अलाद्दिन' ने सरशी केली आहे. आत्तापर्यंतच्या कमाईनुसार वीकेंडला या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई केली आहे. त्यामुळे आता आठवड्याभरात याच्या कमाईवर चित्रपटाचे भविष्य अवलंबून असणार आहे.

अलाद्दिन चित्रपटाची कमाई :

शुक्रवार : साधारण ,१५,००,०००

शनिवार : साधारण ,२५ ,००,०००

रविवार : साधारण ७,५०,००,०००

पीएम मोदी पहिल्या आठवड्यात तेवढा करिष्मा दाखवू शकला नाही, या चित्रपटाची पहिल्या आठवड्यातील कमाई सरासरी १० कोटींची झाली. मात्र रविवारी चित्रपटाने पकड घेतली. त्यामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सरशी करण्याची अजूनही संधी आहे.

 
पीएम मोदी चित्रपटाची कमाई :

शुक्रवार : साधारण २ ,३५,००,०००

शनिवार : साधारण ३,००,००,०००

रविवार : साधारण ४,२५,००,०००

इंडियाज मोस्ट वोन्टेड चित्रपटाच्या बाबतीत तर खूपच निराशाजनक कमाई झाली. याचे महत्वाचे कारण म्हणजे या चित्रपटाविषयी झालेली कॉंट्रोव्हर्सी. १ हजार पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपटा दाखवण्यास मनाई करण्यात आली आणि याचाच वाईट परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईवर झालेला दिसत आहे.

 

इंडियाज मोस्ट वोन्टेड चित्रपटाची कमाई :

शुक्रवार : साधारण ,८५,००,०००

शनिवार : साधारण ,५०,००,०००

रविवार : साधारण ,००,००,०००

वरील आकडेवारीवरून आता असा अंदाज लावता येईल की प्रेक्षकांनी अल्लादिन चित्रपटाला सर्वात जास्त पसंती दिली आहे तर त्या खालोखाल सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पीएम मोदी यांच्यावरील जीवनपटाचा क्रमांक आहे तर वादाच्या भवऱ्यात सापडल्यामुळे इंडियाज मोस्ट वोन्टेड हा चित्रपटा सध्या संघर्ष करताना दिसून येत आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat