'आर्टिकल १५' चे पहिले पोस्टर प्रकाशित

    27-May-2019
Total Views |

 

 

अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'आर्टिकल १५' या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. धक्कादायक अशा सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिका साकारणार आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याची भूमिका तो साकारत असून त्याच्याबरोबरच इशा तलवार, मनोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहद झीशान अय्युब हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

 

भारताच्या संविधानात प्रत्येक नागरिकाला काही हक्क आणि जबाबदाऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व हक्कांचे आणि कर्तव्यांचे पालन व्हावे यासाठी कायदे आहेत त्यापैकीच एक कायदा म्हणजे कलम १५. हे कलाम धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माच्या स्थानावरील भेदभावाचा निषेध दर्शवणारे आणि त्याविरुद्ध कारवाई करणारे कायदे नमूद करणारे कलम आहे. त्यामुळे आता या चित्रपटात या कालमाशी निगडित कथा पाहायला मिळेल. या चित्रपटाची कथा गौरव सोलंकी आणि अनुभव सिंह यांनी लिहिली आहे.

 

या चित्रपटाचा टीजर देखील आज प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपटकर्त्यांनी जाहीर केले असून १ मार्च पासून सुरु झालेल्या या चित्रपटाच्या प्रवासाचे काय फळ मिळते हे आता येत्या २८ जूनला म्हणजेच प्रदर्शनाच्या दिवशी पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat