- पार पडली दुसऱ्या पर्वाची पहिली नॉमिनेशन प्रकिया
- अभिजित बिचुकले चर्चेत
- शिवानी आणि शिव मध्ये झाला वाद
मुंबई : बिग बॉस मराठी सिझन २ ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली. स्पर्धक कोण असतील ? घर कसे असेल ? याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. आणि काल संध्या ७ वाजता या सगळ्यावरून पडदा उघडला. महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली आणि याचसोबत हर्षद नायबळ याने पुन्हा एकदा सगळ्यांची मने जिंकली. किशोरी शहाणे, शिवानी सुर्वे, सगळ्यांची लाडकी राधा म्हणजेच विणा जगताप, सुरेखा पुणेकर, वैशाली म्हाडे यांचे एका पेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले. किशोरी शहाणे यांची बिग बॉस मराठी सिझन २ च्या घरात पहिली एन्ट्री झाली आणि त्यानंतर एक-एक करून १४ सदस्य बिग बॉसच्या घरात गेले. बिग बॉस मराठीचे अलिशान घर बघून सगळेच अवाक झाले.
बिग बॉसच्या घरामध्ये अभिजित बिचुकले चर्चेत राहिले. मग ते शिवानी सुर्वेवर म्हटलेले गाणे असो, घरामध्ये झालेला वाद असो वा बिग बॉस च्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो. शिवानी सुर्वे आणि शिव ठाकरे या दोघांची घरामध्ये एन्ट्री होताच वाद झाला आता तो कशावरून झाला? पुढे काय झाले? हे आजच्या भागामध्ये कळेल.
सदस्यांचा पहिला दिवस कसा होता? पहिल्या नॉमिनेशन प्रक्रीयेमध्ये कोण नॉमिनेट झाले? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ रात्री ९.३० वा.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat