भारतीय चित्रपट सृष्टीतील शेहेनशहा म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन आता मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहेत. त्यामुळे आता मराठी चित्रपट सृष्टीला देखील अच्छे दिन आलेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी दिग्दर्शित केलेल्या अक्का या मराठी गाण्यात त्यांनी काम केले होते त्यानंतर पुन्हा एकदा ते मराठी चित्रपटाकडे वळले आहेत.
'एबी आणि सीडी' असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये विक्रम गोखले यांच्याबरोबर ते भूमिका साकारत आहेत. गेल्या मंगळवारपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. चित्रीकरणाची पहिली क्लॅप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते देण्यात आली. चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांचा अभिनय बघून भारावून गेले.
मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी ॲण्ड सीडी' या चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप दिला. या चित्रपटाद्वारे सुपरस्टार अमिताभ बच्चन जी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे.
— Vinod Tawde (@TawdeVinod) May 20, 2019
या निर्मितीसाठी माझ्या मित्राला आणि #एबीॲण्डसीडी टीमला खूप शुभेच्छा! pic.twitter.com/fqDs99D9bN
मिलिंद लेले दिग्दर्शित एबी आणि सीडी या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची व्यक्तिरेखा फार वेळ पडद्यावर दिसणार नसली तरी त्या भूमिकेचा प्रभाव प्रचंड असेल. अमिताभ बच्चन पहिल्यांदाच मराठी चित्रपटात भूमिका साकारत असल्यामुळे सर्वांनाच या चित्रपटाविषयी उत्सुकता आणि कुतूहल वाटणे हे साहजिक आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat