काश्मिरात भगवी लाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |


 


जम्मू काश्मिर : पूर्वेकडील राज्ये आणि सीमाभागात भारतीय जनता पक्षाची वाढती ताकद आता मतपेट्यांमध्ये दिसून येत आहे. दिवसभरात पूर्वोत्तर राज्यांमध्ये भाजपने कमळ फुलवल्यानंतर आता भाजपच्या जम्मू काश्मिर लोकसभा मतदार संघातील जागांवरही आघाडी मिळवली आहे. जम्मू पूंछ येथे भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपचे जुगल किशोर यांनी कॉंग्रेसच्या रमन भल्ला यांना कडवी झुंझ दिली आहे. लदाखमध्ये भाजपच्या जमयांग नमग्याल यांनी आघाडी घेतली आहे.



श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या फारूख अब्दुलांचा विजय निश्चित आहे. त्यांना १ लाख ६ हजार मते मिळाली आहेत. अनंतनाग या मतदार संघात मेहबूबा मुफ्ती या पिछाडीवर आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या हसैन मसुदी यांनी त्यांना मागे टाकले आहे. बारमुला मतदार संघात तिरंगी लढत आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या मोहम्मद अकबर लोने यांनी २८ हजारांची आघाडी घेत नॅशनल कॉन्फरन्सच्या राजा अली आणि अपक्ष उमेदवार इंजिनिअर रशीद यांनी जागा मिळवली यांना मागे टाकले आहे.
 

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत. "एक्झिट पोल खरे ठरले आहेत. भाजप आणि एनडीएने घवघवीत यश मिळवत चांगली कामगीरी केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्र येत लोकसभा निवडणूकीत केलेल्या मेहनतीला यश मिळाले आहे."

 

पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे अभिनंदन. आता कॉंग्रेसलाही एक अमित शाहची गरज आहे. मला माझ्या मतदारांवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी दिलेला कौल मी स्वीकारते.", असे सांगत त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचेही विजयाबद्दल अभिनंदन केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@