भिवंडी लोकसभेतून कपिल पाटील विजयी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |


भिवंडी : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरळीत पार पडली असून भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे कपिल पाटील यांनी पहिल्या फेरीपासून मतदानात आघाडी घेत काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांचा दीड लाख मतांनी पराभव करीत विजय संपादन केला आहे. भाजपचे कपिल पाटील यांना ४ लाख ९८ हजार ३६८ मते तर सुरेश टावरे यांना ३ लाख ५२ हजार २४३ मते मिळाली आहेत.

शहरी, ग्रामीण, आदिवासी, अल्पसंख्याक, परप्रांतीय अशी बहुरंगी लोकसंख्या असलेला भिवंडी लोकसभा मतदारसंघ कुणाच्या बाजूने कौल देतो, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खा. कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यामध्ये लढत झाली आहे.

कपिल पाटील यांच्याविरोधात मतदार आणि मित्रपक्ष शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांचे असलेले लक्षणीय प्रमाण यामुळे कपिल पाटील यांना ही निवडणूक जड जाणार असे बोलले जात होते. पण या सर्वांवर मात करीत कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभेतून मोठा विजय संपादन केला आहे. पाच विधानसभा मिळून बनलेल्या या लोकसभा मतदार संघात कुणबी, आगरी, अल्पसंख्याक मतांचा वाटा मोठा होता.


कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी

कल्याण-डोंबिवली मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीकडून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. कल्याण हा शिवसेनेचा गड मानला जातो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे यांनीच निवडणूक लढवली होती. त्यांना यावेळी चार लाख, ४० हजार, ८९२ मते मिळाली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना १ लाख, ९० हजार, १४३ मते मिळाली, तर तिसऱ्या स्थानावर मनसेचे प्रमोद पाटील होते. त्यांना १ लाख, २२ हजार, ३४९ मते मिळाली होती.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@