Live Update : विदर्भातही भाजपची आघाडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |


नागपूर : देशभरातील लोकसभा मतदार संघांप्रमाणे भाजपप्रणित एनडीएने विदर्भाच्या गडावरही आघाडी मिळवलेली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदार संघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. नितीन गडकरी यांनी सकाळपासून आपली आघाडी कायम राखली आहे. गडकरी १७ हजार मतांनी पुढे आहेत. कॉंग्रेसच्या नाना पटोले यांच्याशी गडकरींची थेट लढत आहे.

 

नागपूर : अमरावती लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत आहे. शिवसेनेचे आनंदराव अडसुळ आणि राष्ट्रवादीच्या नवनीत राणा यांच्यातील ही प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे. शिवसेनेचे अडसुळ हे ५ हजार ८०० मतांनी आघाडीवर आहेत.

 

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, कॉंग्रेसचे हिदयतुल्ला पटेल आणि भाजपचे संजय धोत्रे यांच्यातील तिरंगी लढतीतही भाजपनेच आघाडी घेतली आहे. ७७ हजार मतांनी धोत्रे आघाडीवर आहेत.

 

भंडारा - गोंदीया : भाजपचे सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीचे जयराम पंचभुळे यांच्यात थेट लढत आहे. या मतदार संघात भाजपने ३३ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

 

बुलडाणा : शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगरे यांच्यात थेट लढत आहे, या जागेवरही एनडीए आघाडीवर आहे. प्रतापराव जाधव यांनीही ४० हजारांनी आघाड़ी मिळवलेली आहे.

 

गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मतदान प्रक्रीया उधळून लावण्याचा प्रयत्न केल्यानंतरही नागरिकांनी विक्रमी मतदान केले होते. भाजपने या ठिकाणीही आघाडी घेतली आहे. भाजपचे अशोक नेने आणि कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत होती. अशोक नेने यांनी या जागेवर ३४ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat




@@AUTHORINFO_V1@@