नवदीप सिंह दिग्दर्शित 'लाल कप्तान' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली. आनंद एल. राय आणि इरॉस इंटरनॅशनलची निर्मिती असलेला 'लाल कप्तान' ६ सप्टेंबर २०१९ ला देशभर प्रदर्शित होणार आहे. सैफ अली खान डिजिटल माध्यमांमधील सॅक्रेड गेम्स आणि येऊ घातलेल्या सेक्रेड गेम्स २ मधील उत्तम कामगिरीनंतर पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसणार आहे.
Saif Ali Khan in #LaalKaptaan... Release date finalized: 6 Sept 2019... Directed by Navdeep Singh... Eros International and Aanand L Rai presentation... Here's the first look poster: pic.twitter.com/OeAKrLhWEN
— taran adarsh (@taran_adarsh) May 20, 2019
'लाल कप्तान' या चित्रपटाची पहिली झलक तुमची या चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढवेल. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले असून यामध्ये सैफ अली खान एका नागा साधूच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. या साधूच्या चेहऱ्यावर अतिशय धीर गंभीर अशी मुद्रा आहे. हा चित्रपट म्हणजे फसवणूक आणि बदला यांचे एक थरारक नाट्यमय रूपांतरण असेल अशी चर्चा आहे.
या पूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान सैफ आली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली होती. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली असेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat