'मोगरा फुलाला' चित्रपटाचे शीर्षक गीत ऐकले का ?

    20-May-2019
Total Views |

 

स्वप्नील जोशी मुख्य भूमिका साकारत असलेल्या श्राबनी देवधर दिग्दर्शित 'मोगरा फुलाला' या चित्रपटाचे सुमधुर असे शीर्षक गीत आज प्रदर्शित झाले. संगीत सृष्टीतील सुरांची कट्यार प्राप्त झालेल्या शंकर महादेवन यांनी या गाण्याचे पार्श्वगायन केले आहे. शंकर महादेवन यांच्या गायकीचे कौतुक करत अभिनेता स्वप्नील जोशीने हे गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे.

 

या चित्रपटाच्या माध्यमातून रोहित राऊतने संगीत दिग्दर्शनात पदार्पण केले असून या अतिशय भावपूर्ण गाण्याचे शब्द अभिषेक खामकर यांनी लिहिले आहेत. या गाण्याला अधिक प्रभावशाली बनवण्यासाठी किरण विणकर यांनी बासरी, मानस गोसावी यांची मोहनविणा, प्रसाद पाध्ये तबला, प्रतीक कवळे पर्कशन आणि नितीश रणदिवे यांनी उदू ड्रम या वाद्यांनी साथसांगत केली आहे.

'मोगरा फुलाला' हा चित्रपट नात्यांच्या ओलाव्यावर, मोगऱ्याच्या गजऱ्यातील फुले जशी एकात एक गुंफलेली असतात तशीच या चित्रपटातील नाती देखील गुंफलेली आहेत. पण काही वेळा गजरा माळताना त्याच्यात झालेला गुंता सोडवणे कठीण होते अशाच काहीशा आशयाचे हे गाणे आहे.

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि आनंद इंगळे यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, नीना कुळकर्णी, संदिप पाठक, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या १४ जून ला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat