ऑनलाईन कंपन्यांकडून पुन्हा हिंदू देवतांचा अपमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2019
Total Views |




वॉशिंग्टन : अमेरिकेच्या बोस्टन येथील वेफायरया ई-कॉमर्स कंपनीने शंकराचे चित्र असलेली पायपुसणी विक्रीला ठेवली आहे. त्यामुळे या कंपनीवर बहिष्कार टाकण्याचा जोरदार मागणी भारतीयांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदू देवतांचा अवमान करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात अमेझॉनया ई-कॉमर्स कंपनीनेही हिंदू देवतांचे चित्र असलेली पायपुसणी विक्रीला ठेवली होती. यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. भारतीयांनी आता दोन्ही वेबसाईटवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

 

'वेफायर' ही ई कॉमर्स कंपनी घरगुती वस्तू विकते. यापूर्वीही वेफायर कंपनीने हिंदू देवतांचा अवमान केला होता. मात्र लोकांनी वेफायर विरोधात उचलेल्या आंदोलनानंतर वेफायरने माफी मागितली होती. आता मात्र पुन्हा तशीच बाब उघडकीस आली आहे. शंकराची प्रतिमा असणारी पायपुसणी वेफायर २ हजार ६७३ रुपयांना विकत आहे. तर गणपतीची प्रतिमा असणारी पायपुसणी २ हजार ९५३ रुपयांना विकली जात आहे.

 

नेटीझन्सकडून #BoycottAmazon

गेल्या आठवड्यात अमेझॉनने देखील अशाप्रकारच्या पायपुसणी विक्रिला ठेवल्या असल्याने ट्विटरवर हिंदू युजर्सनी अमेझॉन बंदची हाक दिली होती. त्यामुळे ट्विटरवर #BoycottAmazon हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंडिगला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@