सी-६० पथकाची का आहे नक्षलींमध्ये दहशत ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |



गडचिरोली : नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोलीत १९९२ मध्ये विशेष कृती दलाची स्थापना केली होती. यासाठी स्थानिक आदिवासींची भरती करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले होते. सुरुवातीला साठ जणांची नियुक्ती या पथकात करण्यात आल्याने याला सी-६० म्हणतात.

 

कालांतराने नक्षलवादाचा बिमोड करणारे पथक म्हणून या पथकाची ओळख झाली. या पथकात सध्या एक हजार जवान आहेत. त्यांना गनिमी युद्धनितीचे प्रशिक्षण दिले जाते. अत्याधूनिक शस्त्रास्त्र आणि बढतीही दिली जाते. या पथकात आदिवासींचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना स्थानिक भाषा, लोकसंस्कृती आणि भूभागाची योग्य माहिती असते. परिणामी गनिमी युद्धतंत्रात त्या महत्त्वाच्या ठरतात.

 

या पथकाची दहशत नक्षलवाद्यांमध्ये आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या अस्तित्वावर घाला येण्याची भीती त्यांना आहे त्यामुळे १९९०च्या उत्तरार्धात आणि २००० मध्ये नक्षलींनी सी-६० मध्ये भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना परावृत्त करण्यासाठीच त्यांच्यातल्या काही उमेदवारांना आणि त्यांच्या नातेवाईकांची हत्त्या केली होती. गेल्या दोन दशकात सी-६० या पथकाने माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat



@@AUTHORINFO_V1@@