
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुद्ध पौर्णिमेनिम्मित जनतेला शुभेच्छा दिल्या. अहिंसा, शांतता, करुणा आणि मानवसेवा या भगवान बुद्धांच्या शिकवणीतल्या मूल्यांचा मानवी इतिहास आणि संस्कृतीवर मोठा प्रभाव राहिला आहे. सध्याच्या काळासाठी ही मूल्ये अधिकच समर्पक असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
#बुद्धपूर्णिमा के अवसर पर सभी देशवासियों और वैश्विक बौद्ध समुदाय को बधाई और शुभकामनाएं। भगवान बुद्ध के शांति, अहिंसा और करुणा के संदेश का महत्व वर्तमान समय में और भी बढ़ गया है। आइए, उनकी शिक्षाओं पर चलकर हम दुनिया भर में परस्पर भाईचारा बढ़ाएं - राष्ट्रपति कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) May 18, 2019
यासोबतच उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही बुद्ध पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. भगवान बुद्ध हे या धरतीवरचे महान आध्यात्मिक नेते होते. अहिंसा आणि करुणा हा त्यांनी दिलेला शाश्वत संदेश जगभरातल्या मानवतेला सदैव स्फुर्ती देत राहिल असे उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. या आनंदाच्या प्रसंगी धर्म, करुणा आणि मैत्री या भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावरुन वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध राहूया असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.
बुद्ध पूर्णिमा के पावन अवसर पर भगवान बुद्ध के जीवन दर्शन का अनुकरण करें। उनके द्वारा दिखाए अष्टांग मार्ग का पालन कर हम जीवन और समुदाय के संघर्षों से मुक्ति पा सकते हैं। उनका दिखाया मध्यमार्ग समाज में व्याप्त कट्टरता का निवारण कर सकता है। शाक्य मुनि के चरणों में मेरा सादर वंदन। pic.twitter.com/mZCEZQ31HO
— Vice-President of India (@VPIndia) May 18, 2019
अहिंसा, शांतता, करुणा आणि शांतीचे प्रणेते भगवान बुद्ध यांचे विचार देशातील नागरिकांना नेहमी प्रेरित करत राहतील असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुद्ध पौर्णिमेनिम्मित जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
सभी देशवासियों को बुद्ध पूर्णिमा की बहुत-बहुत शुभकामनाएं। सत्य, अहिंसा, दया, करुणा और शांति के दूत भगवान बुद्ध के महान संदेश देशवासियों को सदा प्रेरित करते रहेंगे। pic.twitter.com/X5fPmwpSML
— Narendra Modi (@narendramodi) May 18, 2019
बुद्धपौर्णिमेचा पवित्र दिवस भगवान बुद्धांच्या महान जीवन कार्याचे तसेच त्यांच्या करुणा, अहिंसा, समता व प्रेम या शाश्वत मूल्यांचे स्मरण देतो. या मंगल प्रसंगी राज्यातील सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो, असे सांगत राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat