रोईंगपटू दत्तू भोकनळविरोधात गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2019
Total Views |


 


नाशिक : राष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर संबंधित महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी नाशिकच्या आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. विवाहाची तारीख दोनदा ठरवूनही तो विवाहाला उपस्थित राहिला नाही आणि त्यामुळे फसवणूक झाल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

 

महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, "२०१५ मध्ये दत्तूला आर्मीमध्ये मेडल मिळाल्याने चांदवडमध्ये गावकऱ्यांनी त्याचा सत्कार ठेवला होता. तेव्हा त्याची आणि माझी ओळख होऊन मैत्री झाली. काही दिवसांनी मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही दोघांनी डिसेंबर २०१७मध्ये पुण्याच्या आळंदीला जाऊन एका कार्यलयात हिंदू पद्धतीने लग्न केले. मात्र, याबाबत कुठेही वाच्यता न करता काही दिवसांनी दोघांकडच्या नातेवाईकांसमक्ष गावी लग्न करायचे आम्ही ठरवले होते. मात्र त्यानंतर आम्ही लग्न करणार असे आमच्या घरी सांगितले. दोन वेळा लग्नाची तारीख ठरवून कार्यालय बुक करुनही, दत्तूने ऐनवेळी नकार दिला. त्याने मला २२ डिसेंबर २०१७ ते ३ मार्च २०१९ या काळात शारीरिक आणि मानसिक त्रास देत माझी फसवणूक केली. विशेष म्हणजे लग्नाबाबत विचारल्यास मी विष पिऊन आत्महत्या करेन, अशी धमकीही दत्तूने मला दिली."

 

यासर्व प्रकारानंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दत्तू आणि त्यांच्या वकिलांनी या प्रकाराबाबत माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला. ही सर्व तक्रार खोटी असून या महिलेचे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडू असंही त्यांनी सांगितले. दत्तू भोकनळने २०१६मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये दत्तूने रोईंगच्या सिंगल स्कल्स प्रकारात गटात ६ मिनिटे आणि ५४.९६ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून १३वे स्थान गाठले होते. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा दत्तू महाराष्ट्रातला पहिलाच रोईंगपटू ठरला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@