गुरांनी कॅरी बॅग खाल्ल्यास चिंता नाही ! बटाटा आणि मक्यापासून बनणार कॅरीबॅग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : प्लास्टीक कचऱ्याची जगासमोर उभी आहे. मात्र, दिल्लीतील एका कंपनीने या समस्येवर मात करण्यासाठी नवकर प्लास्टीक या कंपनीने त्यांचा कोट्यवधींचा प्लास्टीक बनवणारा प्लांट बंद करून बायो कॅरीबॅगचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कंपनीचे सर्वेसर्वा पंकज यैन यांनी २०१७ मध्ये प्लास्टीकच्या भस्मासुराची उभी असलेली समस्या पाहून हा पर्याय स्वीकारला. त्यानुसार दिल्लीतील एनसीआर येथे बायोकॅरीबॅगचा प्लांट उभा केला.

 

पंकज जैन यांच्या सोबत घडलेल्या एका किस्स्यामुळे त्यांनी प्लास्टीकच्या पिशव्यांचे उत्पादन थांबवले. पंकज जैन यांच्या घराजवळ असलेल्या एका गोशाळेत एका गाईच्या पोटातून ३५ किलो प्लास्टीकचा कचरा काढण्यात आल्याचे त्यांनी पाहीले. ही घटना त्यांना अस्वस्थ करणारी ठरली. त्यानंतर प्लास्टीकचे उत्पादन करणार नाही, असा निश्चय त्यांनी केला. पंकज जैन यांनी बटाटा, मका आणि अन्य खाद्यपदार्थांतून निघणाऱ्या स्टार्चद्वारे बायो कॅरीबॅग बनवण्याचे संशोधन सुरू केले होते.

 

जैन यांनी साडेचार कोटींची गुंतवणूक केल्यानंतर त्याअंतर्गत बायोप्लास्टिक बॅग तयार करण्याचा प्लान्ट सुरू केला. या प्लान्टमध्ये एकूण ६० ते ७० कर्मचारी कार्यरत आहेत. पकंज जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बायो प्लास्टिक बॅग बायोडिग्रेडेबल, ५० माइक्रोन बॅगच्या दुप्पट महाग असतात. त्यासाठीचा कच्चा माल हा परदेशातून आयात करावा लागत आहे. प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, चीन, यूएस आणि थायलंड येथून हा माल येतो. त्यासाठी लागणाऱ्या स्टार्चचे उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रकल्पाची आणि गुंतवणूकीची गरज आहे. आम्हाला यासाठी सरकारची मदत हवी असल्याचे जैन सांगतात.

 

सरकारचा पाठींबा मिळाल्यास आम्ही पर्यावरणपूरक बॅग उत्पादनासह देशातील शेतकऱ्यांना फायदा पोहोचवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जो माल शेतकऱ्यांकडून कमी किमतीत विकत घेतला जातो, तो माल आम्ही योग्य किमतीत खरेदी करू, अशाप्रकारे बायोप्लास्टीक बॅगचा उत्पादन खर्च कमी होईल. विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर २८० रुपये प्रतिकिलोवर १८ टक्के जीएसटी आकारला जात आहे. त्यातून सवलत मिळाल्यास उत्पादन खर्च कमी होईल, असे जैन सांगतात.

 

पर्यावरणावरील संकट टळण्यास मदत होईल

बायो प्लास्टीक बॅगचे विघटन होण्यास एक दिवस पुरेसा असतो. त्याचे विघटन झाल्यास कंपोस्ट खत म्हणूनही त्याचा वापर केला जाऊ शकतो. या पिशव्या कचऱ्यात फेकल्या तरीही तिथे लवकर विघटन होऊ शकते. या पिशव्या चारा म्हणून जनावरांना खाल्ल्यास त्यांनाही बाधा होणार नाही. पंकज जैन यांच्या मोहिमेशी जोडण्यासाठी नवकर प्लास्टीकसह [email protected] वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पिशव्यांच्या विक्रीवर से टक्के नफा मोबदला म्हणून देण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@