विश्वचषकात बेटिंग, फिक्सिंग टाळण्यासाठी उचलले 'हे' पाऊल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : आयसीसी विश्वचषक २०१९चा थरार ३० मेपासून अनुभवता येणार आहे. यावर्षी हा विश्वचषक इंग्लडमध्ये पार पडणार आहे. याचपार्श्वभूमीवर आयसीसीकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विश्वचषक अधिक पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सर्व दहा संघासोबत आयसीसीकडून एक अॅण्टी करप्शन अधिकारी नेमण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला स्वतंत्र भ्रष्टाचारविरोधी अधिकारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. बेटिंग, फिक्सिंगचे वाढते जाळे लक्षात घेता आयसीसीच्या हा निर्णय अतिशय फायदेशीर ठरेल असे जाणकारांनकडून सांगण्यात येत आहे.

 

आयसीसीच्या कार्यपद्धतीनुसार विश्वचषक सामन्यांच्या शहरात एक अॅण्टी करप्शन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत असे. परंतु, आगामी विश्वचषकापासून प्रत्येक संघावर नजर ठेवण्यासाठी सराव सामन्यांपासून त्या संघाच्या विश्वचषकातल्या अखेरच्या सामन्यापर्यंत, एकच अधिकारी त्या संघासोबत राहणार असल्याचे आयसीसीकडून सांगण्यात आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, आयसीसीने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याचा मुक्कामही त्या त्या संघाच्या हॉटेलमध्येच राहिल. विश्वचषकाला भ्रष्टाचार आणि फिक्सिंगपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आयसीसीने ठोस पाऊल उचलले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@