चीनी माध्यमांकडून मोदी सरकारचे कौतूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2019
Total Views |



बीजिंग : भारतावर पाकिस्तानच्या मदतीने कुरघोडी करणाऱ्या चीनने आता लोकसभा निवडणूकांच्या मध्यावर मोदी सरकारवर स्तुतीसुमने उधळली आहेत. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने मोदी सरकारच्या विविध योजनांचे कौतूक करत भारताची प्रगती वाखाणण्याजोगी असल्याचे म्हटले आहे. 'भारतापेक्षा आम्ही खूप पुढे निघून गेलो आहोत. दोन्ही देशांतील आर्थिक वृद्धीचे अंतर फार वाढले आहेत. चीनची अर्थव्यवस्था १३. ट्रिलियन इतकी झाली आहे. मात्र, भारत आतापर्यंत केवळ . ट्रिलियनच्या जवळपास आहे. त्यामुळे भारतालाही वृद्धीदर वाढवावा लागणार आहे, असे मत ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राद्वारे व्यक्त करण्यात आले आहे. मात्र, यावेळी मोदी सरकारने केलेल्या सुधारणांचाही लेखाजोखा यात मांडण्यात आला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि काही क्षेत्रांमध्ये होत असलेली प्रगती ही वाखाणण्याजोगी असल्याचे ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले आहे. 'भारताचा विकासदर हा पाच वर्षांत . टक्क्यांवर पोहोचला आहे. परंतु सांख्यिकी कारणास्तव आकड्यांवर परिणाम होत आहे. जीडीपी मोजण्याचे तंत्र आणि आधार वर्ष बदलल्यानंही वृद्धीदरावर प्रभाव पडला आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही तेलाच्या किमती पडल्या आहेत. भारत दरवर्षी यावर बऱ्यापैकी पैसे खर्च करतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या चढ-उतारही भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक ऊर्जेच्या किमतीतही फायदा होत असल्याचे यात म्हटले आहे.

 

नोटाबंदी व जीएसटीविषयी

नरेंद्र मोदींनी आर्थिक सुधारणांमध्ये केलेल्या प्रगतीवर ग्लोबल टाइम्सच्या लेखातून स्तुतिसुमने उधळण्यात आली आहेत. नोटाबंदी, कर सुधारणासारख्या गोष्टी अचानक करण्यात आल्याने सामान्यांना थोडासा धक्का बसला होता. त्याचा नकारात्मक परिणामही जाणवला, पण ते स्वाभाविक असल्याचेही ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे. गेली काही वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देणारी ठरलेली आहेत. मोदी सरकारच्या योजना या दीर्घकालीन असून त्याचा सकारात्मक परिणाम येत्या काही वर्षात दिसेल, असेही वृत्तपत्रात म्हटले आहे.

 

उत्पादन क्षेत्रात वृद्धी

चीन आणि भारताच्या तुलनेत उत्पादन क्षेत्रात मोठी तफावत आहे. चीनतर्फे या क्षेत्रासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते. येत्या काळात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणारे बदल भारताच्या फायद्याचे असून त्यामध्येही मोठी वृद्धी पाहायला मिळणार आहे. भारतातील उत्पादन क्षेत्राला आणखी प्रोत्साहन मिळण्याची गरज असल्याचेही ग्लोबल टाईम्सच्या लेखात म्हटले आहे. भारतात होणाऱ्या स्मार्टफोन्स, इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या उत्पादनाबद्दलही यात उल्लेख करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@