
नवी दिल्ली : उन्हाळ्यासह दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या राज्यातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चातकासारखे अनेकांचे डोळे लागून राहिलेल्या मान्सूनची प्रतीक्षा आता संपणार आहे. केरळमध्ये मान्सून ४ जूनमध्ये दाखल होईल, असा अंदाज 'स्कायमेट'ने वर्तविला आहे, केरळनंतर काही दिवसांतच मान्सून राज्यात दाखल होतो, त्यामुळे महाराष्ट्राला रणरणत्या उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मान्सून हा सरासरीहून कमी म्हणजे ९३ टक्क्यापर्यंत पडेल, असे स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या खासगी संस्थेने म्हटले आहे. अंदमान व निकोबार बेटावर मान्सून २२ मे रोजी येणार आहे. यापूर्वी दोन दिवस किंवा दोन दिवसानंतरही मान्सून तिथे येवू शकतो, असे स्कायमेटने हवामान अंदाजात म्हटले आहे. मान्सून सर्वात कमी पूर्व व पूर्वोत्तरकडील भागात सर्वात कमी पडेल, असा स्कायमेटने अंदाज वर्तविला आहे. तर उत्तर-पश्चिम आणि दक्षिण भारतात मान्सूनची स्थिती चिंताजनक असेल, असे स्कायमेटने म्हटले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat