हुआ तो हुआ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2019
Total Views |

सॅम पित्रोदा नावाचे एक गृहस्थ आहेत. राहुल गांधी त्यांना आपले गुरू मानतात. राहुल गांधींचे तसे अनेक गुरू आहेत. गांधी घराण्याशी सॅम यांचा वर्षानुवर्षे अतिशय निकटचा संबंध राहिला आहे. अगदी श्रीमती इंदिरा गांधी ते राजीव गांधी आणि आता राहुल गांधींपर्यंत ते गांधी घराण्याचे अतिशय विश्वासू असे व्यक्तिमत्त्व मानले जाते. या तिन्ही वंशवादाच्या काळात सॅम पित्रोदा यांनी देशात अनेक पदेही भूषविली. त्यांपैकी एक म्हणजे नॅशनल नॉलेज कमिशन. म्हणजे राष्ट्रीय ज्ञान आयोग. या आयोगाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांना कॅबिनेट दर्जा होता. शिवाय ते नॅशनल इनोवेशन कौन्सिलचे म्हणजे राष्ट्रीय सृजन परिषदेचेही अध्यक्ष होते. आपल्या ज्ञानाचा अचूक वापर करून नवसृजन निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असे बोलले जाते. पण, आपल्या बुद्धिमत्तेचा वापर त्यांनी राहुलची पप्पू असलेली प्रतिमा अधिक उंचावावी म्हणून त्यांना बिनकामाचे सृजनतेचे धडे देणे सुरू केले. त्यांना शिकविले. देशात कुठे कसे बोलायचे, विदेशात कसे बोलायचे, हे त्यांनीच शिकविले. राहुल गांधीच ते. त्यांनाही अशा गुरूची गरज होतीच. 2014 मध्ये कॉंग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर आता पक्षाचे पुनरुज्जीवन कसे करावे, यावर मंथन झाले. त्या मंथनातून पुढे आले सॅम पित्रोदा यांचे नाव. या सॅम पित्रोदाची राहुल गांधी यांनी इंडियन ओव्हसीज कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली. मोदींवर खोटे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा सल्ला याच सॅम पित्रोदाचा.
अंकल सॅम राहुलना घेऊन अनेक देशांत फिरले. तेथे राहुलची अनेक भाषणे झाली. विदेशी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना काय उत्तरे द्यायची, हे सॅम पित्रोदा यांनी आधीच शिकवून ठेवले होते, तशी राहुल उत्तरे द्यायचे. अशातच ते लंडनच्या दौर्यात तिथले खासदार आणि स्थानिक मान्यवरांशी संवाद साधत असताना, त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. 1984 च्या शीख नरसंहाराबद्दल आपल्याला काय वाटते? त्यावर राहुल गांधी म्हणाले होते, ती एक अत्यंत वेदनादायी घटना होती, एक ट्रॅजेडी होती, पण त्यात कॉंग्रेसचा हात होता, हे मी मानत नाही. हे होते राहुल गांधी यांचे बोल. राहुलने असेच उत्तर द्यायचे, हे अंकल सॅम यांनीच शिकविले होते. ही तारीख होती 25 ऑगस्ट 2018. ही बाब जेव्हा भारतात कळली, तेव्हा शीख समुदायातून प्रचंड संताप व्यक्त झाला. राहुल गांधी यांच्यावर प्रचंड टीका झाली. राहुल गांधी यांच्या विधानानंतर अवघ्या चार महिन्यांनंतर सज्जनकुमार यांना 1984 च्या नरसंहार प्रकरणी शिक्षाही झाली. तरीही राहुल गांधींनी त्या नरसंहारात कॉंग्रेसचा सहभाग नव्हता, हेच पालुपद सुरू ठेवले. अगदी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरिंसग यांनीही राहुल गांधी यांच्या या विधानावर तीव्र नापसंती व्यक्त केली आणि दोषींना कडक शासन व्हावे, या आपल्या भूमिकेवर ते आजही ठाम आहेत. देशाच्या अन्य भागातही राहुल गांधींवर कठोर शब्दांत टीका करण्यात आली.
ब्रिटनमधील, राहुल गांधी यांचे व्यक्तव्य तेव्हापासून त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. 1984 च्या घटनांची आठवण या ना त्या कारणाने समोर येत असतानाच, राहुल गांधी यांचे गुरू सॅम पित्रोदा यांनी त्या घटनेला पुन्हा जिवंत केले. केवळ जिवंतच केले नाही, तर ‘हुआ तो हुआ’ असे म्हणून शीख समुदायाच्या जखमेवर मीठ चोळले. यावर गदारोळ झाला नसता तरच नवल. पुन्हा एकदा त्या घटनेच्या जखमेवरील खपल्या निघाल्या आणि तो रक्तरंजित नरसंहार पुन्हा शीख समुदायाच्या डोळ्यांपुढे आला. त्या भीषण नरसंहारात जे लोक सुदैवाने वाचले, त्यांनी सांगितलेल्या त्या क्रूरतेच्या कथा अंगावर शहारे आणणार्या आहेत. वाहनांची पेट्रोलची टाकी फोडून त्यातील तेल अंगावर ओतून शीख बंधू-भगिनींना जिवंत जाळण्यात आले. लहान बालकांनाही कॉंग्रेसच्या नराधमांनी सोडले नाही. कॉंग्रेसने या नरसंहारातील दोषींना वाचविण्यासाठी सारेकाही केले. अनेक आयोग बसविले, पण कारवाई कुणावरच केली नाही. या नरसंहारातील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी एक बाणेदार शीख मात्र 1984 पासून सतत पाठपुरावा करीत राहिला. त्याचे नाव अॅड. एच. एस. उपाख्य हरिंवदरिंसग फुल्का. त्यांनी 1985 पासून याचा पाठपुरावा केला आणि अखेर जानेवारी 2018 मध्ये त्यांना यश आले. सर्वोच्च न्यायालयाने नवीन एसआयटी (विशेष तपास चमू) नेमून 186 प्रकरणांचा नव्याने तपास करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात एक प्रकरण सज्जनकुमार यांचे होते व त्यांच्यावर दोष शाबीत होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. यात एचकेएल भगत आणि जगदीश टायटलर यांच्यासोबतच एक प्रकरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचेही आहे. पण, कुणालाही त्याची खंत नाही. राहुल गांधी यांनी अजूनही माफी मागितलेली नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बाकीचा फाफटपसारा त्यांनी खूप सांगितला. असे झाले पाहिजे, तसे झाले पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे वगैरे. पण, मी माफी मागणार नाही, हे मात्र त्यांनी ठासून सांगितले. एवढा निगरगट्टपणा कशासाठी? या देशातील फक्त गांधी-नेहरू घराण्याच्या लोकांचाच जीव महत्त्वाचा आहे का? बाकी जनता किडेमाकोडे आहे का?
त्याचे कारण आहे- तथाकथित गांधी आणि वाड्रा परिवाराची मस्ती अजून उतरलेली नाही. त्यांना भारत देश म्हणजे आपली जहागिरी वाटते. 1984 च्या शीख नरसंहाराचे हे एकमेव प्रकरण नाही. तत्पूर्वी, महाराष्ट्रात नामांतर आंदोलनाच्या वेळीही कॉंग्रेसच्या गुंडांनी दलितांना जिवंत जाळले होते आणि ओल्या बाळंतिणींवर बलात्कार केले होते. दलित-मातंग समाजाच्या वस्त्या जाळून टाकण्यात आल्या होत्या. ते सर्व खटले दडपून टाकण्यात आले. एकालाही शिक्षा झाली नाही. त्या घटनेबाबतही एकाही कॉंग्रेस नेत्याने अजून माफी मागितलेली नाही. दलितांवर अत्याचार हा तर कॉंग्रेसचा आवडता छंदच होता. नेहमी फुले-आंबेडकरी समुदायाला आपल्या पायाखाली ठेवणे, हेच काम तर कॉंग्रेसने केले. नामांतर आंदोलनात आंबेडकरी समुदायाच्या हत्या, 1984 चा शीख नरसंहारात आणि वर्षानुवर्षांपासून मुस्लिम समुदायावर अत्याचार हे पाप सातत्याने कॉंग्रेसने केले. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठात जाहीरपणे सांगितले होते की, कॉंग्रेसचे हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले आहेत. राहुल गांधी आणि त्यांच्या दरबारींनी तर लाजच विकून खाल्ली आहे. कॉंग्रेस पक्षात अलीकडे नालायक लोकांचा भरणा खूप मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. सॅम पित्रोदा त्यांपैकी एक. म्हणे, माझी हिंदी चांगली नाही. मला, बुरा हुआ असे म्हणायचे होते. हे त्याला कुणी शिकविले? तेव्हा त्याची हिंदी सुधारली का? तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैजारा... त्या लायकीचाच सॅम पित्रोदा हा माणूस आहे. त्याला सोडा. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरिंसग यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करूनही राहुल गांधींनाही जराशीही लाज वाटत नाही. ते म्हणतात, डॉ. मनमोहनिंसग, सोनिया गांधी यांनी माफी मागितली. मी आता कशाला मागू? भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले हे घराणे देशासाठी कलंक ठरले आहे. हा कलंक दूर करण्याचे एकमेव काम या देशातील जनतेला करायचे आहे...
@@AUTHORINFO_V1@@