भारताच्या अर्थव्यवस्थेला गती : चीनची पिछेहाट कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2019
Total Views |


२०२० नंतर अर्थव्यवस्थेचा दर ७ टक्क्यांवर पोहोचणार


वॉशिंग्टन : येत्या दशकात भारतासह आशियातील अनेक देशांचा विकासदर हा ७ टक्क्यांवर पोहोचणार आहे. मात्र, व्यापार युद्धामुळे कंबरडे मोडलेला चीन मात्र, या देशांच्या यादीत नसणार आहे. एका अहवालानुसार, २०२० नंतर जगातील सर्वाधिक गतीमान सात अर्थव्यवस्थांमध्ये पाच देश आशियातील असणार आहेत. यात चीनच्या तुलनेत भारत हा सर्वाधिक वेगाने विकास करणारा देश ठरला आहे.

 

विकासदर ७ टक्क्यांचा टप्पा पार करणार

या अहवालानुसार, जगातील सात देश हे येत्या दशकात सर्वाधिक विकास करणार आहेत. सर्वाधिक वेगाने विकास करणाऱ्या देशांच्या यादीत भारत, बाग्लादेश, व्हिएतनाम, म्यानमार आणि फिलीपाईन्स आदी देशांचा सामावेश आहे. आफ्रिकेतील इथोपिया आणि कोटे डी ओवोरे आदी देशांचाही सामावेश आहे.

 

उत्पन्न वाढणार

ब्लुमबर्ग आणि स्टॅण्डर्ड चार्टडसह तयार केलेल्या या अहवालात वरील नमूद केल्यानुसार, या पाच देशांची अर्थव्यवस्था वेगाने वाढणार आहे. मात्र, या देशातील शिक्षण, आरोग्य आदी समस्या पूर्णपणे सुटतील, असेही नाही. विकासदर वाढल्यानंतर या देशातील उत्पन्नात वाढ होणार आहे. याशिवाय राजकीय सामाजिक आणि पायाभूत सुविधांमध्ये विकास होणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

 

चीनची पिछेहाट कायम राहणार

या अहवालानुसार, चीनचा येत्या दशकात विकासदर हा ५.५ टक्के राहणार आहे. गेली चार दशके चीनची अर्थव्यवस्था सुसाट धावत होती. मात्र, आर्थिक मंदी, व्यापार युद्ध आदींशी सामना करण्यात चीनी अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. २०१७ मध्ये चीनची अर्थव्यवस्था ६.८ टक्के होती २०१८ मध्ये ती ६.६ टक्क्यांवर पोहोचली आहे.

 

व्यापार युद्धामुळे ड्रॅगनची पिछेहाट

जागतिक अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या चीनची व्यापार युद्धामुळे सतत पिछेहाट होत चालली आहे. पुढील वर्षात चीनचा विकासदर ६.२ टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चीनच्या होत असलेल्या नुकसानाचा परिणाम आशियाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@